Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? असा अनेकांना प्रश्न पडलाय (Evidences of link between Deepika Padukone and Drugs).

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 10:53 PM

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात ज्या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आलंय त्यातील सर्वात मोठं नाव म्हणजे दीपिका पादुकोण. दीपिकाला समन्स मिळालं असून ती शनिवारी NCB समोर हजर राहणार आहे. त्यासाठी दीपिकानंही पूर्ण तयारी केलीय. दरम्यान, ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? असा अनेकांना प्रश्न पडलाय (Evidences of link between Deepika Padukone and Drugs).

ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आल्यावर, शूटिंग अर्धवट सोडून दीपिका पादुकोण गोव्याहून मुंबईत आली. चार्टर्ड प्लेननं मुंबईत येताच दीपिका वरळीतल्या फ्लॅटवर आली. दीपिकाच्या आधी 25 सप्टेंबरला रकुल प्रित सिंहची चौकशी होणार आहे. त्यानंतर 26 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. 26 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला देखील समन्स बजावण्यात आलंय. त्यामुळं दीपिकाबरोबरच सारा अली खानही गोव्याहून मुंबईत आलीय. तर इकडे NCB कडून समन्स मिळताच दीपिकानं आपल्या वकिलांची फौजही तयार केलीय.

दीपिकानं 12 वकिलांशी चर्चा सुरु केली असून वकिलांचा सल्ला घेणं सुरु झालंय. NCB च्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरं द्यायची, हे दीपिकानं वकिलांकडून समजून घेतलंय. त्याचबरोबर NCB च्या समन्सला उत्तर देत पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दीपिकानं दर्शवल्याची माहिती टीव्ही9 ला मिळालीय. ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचं नाव कसं आलं हेही समजून घेऊयात.

दीपिका आणि श्रद्धा कपूरचं नाव सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत समोर आलंय. तर मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबतचं व्हॉट्स अ‍ॅपचॅटही NCB च्या हाती लागलेत. त्या चॅटमध्ये दीपिका कथितपणे करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’? करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो… पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. जर म्हणशील तर अमितला विचारते.’ परत दीपिका मेसेज करते. ‘हो प्लीज’. काही वेळानं करिश्मा उत्तर देते, ‘अमित घेऊन येत आहे.’ यावर दीपिका विचारते, ‘हॅश आहे का?’ त्यावर करिश्मा म्हणते की, ‘हॅश नाही गांजा आहे.’

आता प्रश्न हाही आहे की व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळं दीपिका ड्रग्ज प्रकरणात अडकू शकते का? त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅट पुरावा होऊ शकत नाही असं म्हटलंय. मात्र, यातून समोर आलेल्या पेडलरकडून मिळालेली माहिती नक्कीच पुरावा होऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलंय. दीपिकानं दिलेल्या आणखी एका पार्टीची चर्चा सुरु झालीय. दीपिकाचे मॅनेजर करिश्मा सोबतचे चॅट 28 नोव्हेंबर 2017 चे आहेत. त्याच दिवशी दीपिकानं कोको पबमध्ये हॅलोवीन पार्टी दिली होती. आता या पार्टीसाठीच दीपिकानं हॅशची मागणी केली होती का? हाही प्रश्न आहे. या पार्टीचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात दीपिका पादुकोण, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हाही दिसत आहेत.

दीपिकाबद्दलचे प्राथमिक पुरावे NCB च्या हाती लागल्यानेच तिला समन्स पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता दीपिका खरंच ड्रग्ज घेते का? दीपिकासोबत आणखी कोण कोण ड्रग्ज घेत होतं? कोको पार्टीत ड्रग्जचं सेवन झालं का? अशा प्रश्नांची उत्तर शनिवारी NCB मिळवण्याचा प्रयत्न करेल.

संबंधित बातम्या :

Deepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ कळवली

बळीराजाचा रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आंदोलनाच्या दिवशी चौकशीला बोलावलं : राजू शेट्टी

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

संबंधित व्हिडीओ :

Evidences of link between Deepika Padukone and Drugs

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.