Nora Fatehi: बॉलिवुडमध्ये सतत हमशक्ल दिसणाऱ्या व्यक्तीची चर्चा सुरु असते. मराठी, हिंदी अशा अनेक चित्रपटांमधील कलाकारांसारखे दिसणारे हमशक्ल नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. परंतू सध्या सोशल मीडियावर नोरा फतेहीची जास्त चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर एका मुलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
नोरा फतेही बॉलिवुडची सर्वात हॉट आणि धडाकेबाज डान्सर आहे. तिच्या डान्सची सर्व बॉलिवुडमध्ये चर्चा असते. पण सध्या नोराच्या हमशक्लची चर्चा सुरु आहे. नोरा फतेही सारखी दिसणारी इरीना शेवचेंको सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. डालिया बेलीडान्स या नावाने तिचे इन्स्टाग्रामवर पेज आहे. याच अकाउंटवर तिचे बेलीडान्सचे व्हिडीओ आणि फोटो आहेत. जे पाहून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. कारण इरीना ही नोरा फतेहीची हमशक्ल आहे.
नोरा फतेही सारखी फिटनेस आणि लुकने इरीना खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या बेलीडान्सची देखील मोठी चर्चा असून तिचे इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ऐवढच नाही तर बेलीडान्सच्या बाबतीत इरीना नोरा फतेहीला देखील टक्कर देते. तिच्या डान्स व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे.