‘लुका छुपी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, दोन दिवसात किती कमाई?

मुंबई : कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा चित्रपट लुका छुपीने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शानदार अशी कमाई केली आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे. लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर बनवलेला चित्रपट कॉमिक अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे.  या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच चित्रपटाने दोन दिवसात 18 कोटी रुपये कमवले आहेत. ‘लुका छुपी’ने शुक्रवारी […]

'लुका छुपी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, दोन दिवसात किती कमाई?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा चित्रपट लुका छुपीने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शानदार अशी कमाई केली आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे. लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर बनवलेला चित्रपट कॉमिक अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे.  या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच चित्रपटाने दोन दिवसात 18 कोटी रुपये कमवले आहेत.

‘लुका छुपी’ने शुक्रवारी धमाकेदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी 8.01 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.08 कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसात चित्रपटाने 18.09 कोटी रुपये कमवले आहेत. योसोबतच कार्तिक आर्यनच्या करिअरमधील हा पहिला चित्रपट असेल ज्याची ओपनिंग कमाई सर्वात जास्त आहे. यापूर्वी 2015 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘प्यार का पंचनामा 2’ ने पहिल्या दिवशी 6.80 कोटी रुपये कमावले होते. तसेच 2018 मध्ये आलेला चित्रपट ‘सोनू की टीटू की स्वीटी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.42 कोटी रुपये कमवले होते. असे तीन चित्रपटात आतापर्यंत कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

कोणत्या चित्रपटांसोबत होणार टक्कर

लुका छुपीसोबत सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट ‘सोन चिडिया’ही प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाने लुका छुपी चित्रपटाचे काही नुकसान होणार नाही. सोन चिडिया चित्रपटाचे प्रदर्शनही चांगले आहे, पण त्यांना जास्त स्क्रीन मिळालेल्या नाहीत. यामुळे दोन्ही चित्रपटांची तुलना करणे चुकीचे ठरेल. ‘गली  बॉय’चे कलेक्शनही पहिल्यापेक्षा आता कमी झाले आहे. कार्तिकच्या चित्रपटाला अजय देवगनचा टोटल धमाल चित्रपट टक्कर देऊ शकतो. या चित्रपटाने 10 दिवसात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.