Marathi Movie : पूजा सावंत-गश्मीर महाजनीच्या ‘लव्ह स्टोरी’चं गुपित अखेर उलगडलं!

'लव्ह यू मित्रा' हा चित्रपट आजच्या तरुणाईला भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा असा असणार आहे. (Luv U Mitra, New Marathi Movie on love and friendship)

Marathi Movie : पूजा सावंत-गश्मीर महाजनीच्या 'लव्ह स्टोरी'चं गुपित अखेर उलगडलं!
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 1:37 PM

मुंबई : प्रेम…प्यार…लव्ह…इष्क…भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद आहे. प्रेमाला शब्दांत सांगणं तसं कठीणच आहे. प्रेम हे फक्त जोडीदारावरच असतं असं नाही तर कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांवरही असू शकतं. ते कुठेही, कधीही जडू शकतं. प्रेमाची महत्त्वाची गोष्टी म्हणजे प्रेम हे बांधून ठेवणारं नसून ते मुक्त करणारं असतं. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. तरीही अनेक जण आपल्या प्रेमभावना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या  निमित्तानं खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिनाचं औचित्य साधून ‘मिनी फिल्म्स’नं घोषणा केली आहे ‘लव्ह यू मित्रा’या चित्रपटाची.

तरुणाईला भावणारा चित्रपट

हा चित्रपट आजच्या तरुणाईला भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा असा असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला असून वरुण बागला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धार्थ साळवी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. ‘लव्ह यू मित्रा’मध्ये पूजा सावंत, गश्मीर महाजनी ही बेस्टफ्रेन्ड्स असलेली जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिग्दर्शकांची प्रतिक्रिया

‘अशा प्रकारचा विषय मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच हाताळण्यात आला आहे, हा सिनेमा आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत नक्कीच पाहू शकता’, अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला यांनी दिली.

दिग्दर्शकीय पदार्पणासाठी पूजानेही मानसी बागला यांना शुभेच्छा दिल्या असून या चित्रपटाची ती आतुरतेने वाट बघत असल्याचेही तिने सांगितले. तर गश्मीर म्हणतो,” ही स्क्रिप्ट वाचतानाच माझ्या मनाला खूप भावली. त्यात एक वेगळेपण आहे. चित्रपटाचा आशय अतिशय प्रगल्भ आहे . मिनी फिल्म आणि संपूर्ण टीमला माझ्या खूप शुभेच्छा!”

LUV U Mitra

चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार

चित्रपटाचं नाव आणि पोस्टरवरून त्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे हे नक्की. पूजा आणि गश्मिर च्या चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम भेटच ठरणार आहे.  ‘लव्ह यू मित्रा’ची मूळ संकल्पना जरी प्रेमकथेवर आधारित असली तरी हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.