Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षितला पहिला चित्रपट कसा मिळाला ?, तिनेच सांगितला किस्सा
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षित हिचा आज (15 मे) वाढदिवस. गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीचे लाखो चाहते असून तिच्या हास्यावर कित्येक जण फिदा आहे. तेजाब, हम आपके है कौन, बेटा, दिल, अंजाम, दिल तो पागल है, आरजू, साजन, देवदास हे आणि असे एकाहून एक सरस, हिट चित्रपट देणारी माधुरी आजही बॉलिवूडमध्ये तिच्या कामाचा ठसा उमटवत आहे
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित हिचा आज (15 मे) वाढदिवस. गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीचे लाखो चाहते असून तिच्या हास्यावर कित्येक जण फिदा आहे. तेजाब, हम आपके है कौन, बेटा, दिल, अंजाम, दिल तो पागल है, आरजू, साजन, देवदास हे आणि असे एकाहून एक सरस, हिट चित्रपट देणारी माधुरी आजही बॉलिवूडमध्ये तिच्या कामाचा ठसा उमटवत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माधुरीला पहिला चित्रपट कसा मिळाला हे तुम्हाला माहीत आहे का ?
रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितने अवघ्या 16-17 व्या वर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तिने तेव्हा 12वीची परीक्षा दिली आणि तिला सुट्ट्या लागल्या होत्या. त्या दिवसांत ती घरीच मोकळी होती आणि मग तिला तिच्या पहिल्या, ‘अबोध’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. राजश्री प्रॉडक्शनशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने माधुरी दीक्षितला ही ऑफर दिली होती. ती माधुरीच्या मोठ्या बहिणीची मैत्रिण होती. पण माधुरीने अभिनयाच्या जगात पाऊल टाकावे असे तिच्या कुटुंबियांना वाटत नव्हतं. त्यामुळे तिच्या घरच्यांनी (तिला) चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र खूप समजावून सांगितल्यानंतर माधुरीच्या कुटुंबीयांनी होकार दिला. यानंतर या निरागस दिसणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीला स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आले आणि ती पासही झाली.
फ्लॉप झाला पहिला पिक्चर
मात्र असं असलं तरी त्या काळात माधुरीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. पण लोकांना तिचं काम खूप आवडलं. पहिल्या चित्रपटानंतर माधुरीने पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या अभ्यासात व्यस्त झाली, पण मधल्या काळात तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या, ज्यांना तिने नकार दिला आणि कोणताही चित्रपट साइन केला नाही.
View this post on Instagram
सुभाष घईंच्या चित्रपटातून मिळालं यश
सातत्याने फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीचं नशीब उघडलं ते सुभाष घई यांच्या एका चित्रपटाने. तेव्हा त्यांनी माधुरीला उत्तर दक्षिण या चित्रपटाद्वारे पुन्हा लाँच केले आणि तिच्या करिअरला चित्रपटसृष्टीत नवसंजीवनी मिळाली. या चित्रपटात रजनीकांत आणि जॅकी श्रॉफही दिसले होते. ही माधुरीसाठी सुवर्णसंधी ठरली आणि तिने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. या चित्रपटामुळे ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाली. त्यानंतर तिने एकाहून एक सरस, हिट चित्रपट दिले आणि चित्रपटसृष्टीत अबाधित स्थान निर्माण केले.