Nitish Bhardwaj | महाभारताचे ‘कृष्ण’ नीतिश भारद्वाज यांच्या आरोपावर पत्नीचा पलटवार, धादांत खोटं..

महाभारतातील 'कृष्णा'च्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते नितीश भारद्वाज सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नीतिश यांनी त्यांची पत्नी स्मिता यांच्याविरुद्ध मानसिक छळ आणि जुळ्या मुलींना भेटू न दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र आता स्मिता यांनी आरोपांबद्दल बोलत नीतिश यांच्यावर पलटवार केला आहे.

Nitish Bhardwaj | महाभारताचे 'कृष्ण' नीतिश भारद्वाज यांच्या आरोपावर पत्नीचा पलटवार, धादांत खोटं..
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 8:30 AM

Nitish Bhardwaj | महाभारतातील ‘कृष्णा’च्या भूमिकेतील नीतिश भारद्वाज यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ते एवढे लोकप्रिय झाले की लोक त्यांना देव समजून पूजा करायला लागले. मात्र सध्या हेच नीतिश भारद्वाज त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. ते बरेच त्रस्त असून त्यांनी त्यांच्या IAS पत्नीवर गंभीर आरोप लावलेत. भोपाळ येथील पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी स्मिताविरोधात तक्रार दाखल केली. नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता गटे यांच्यावर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप लावला. तसेच ती आपल्याला जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचा दावाही भारद्वाज यांनी केला. आता या प्रकरणात नीतिश यांची माजी पत्नी, स्मिता यांची बाजूदेखील समोर आली आहे. स्मिता यांनी नीतिश यांच्या आरोपांबाबत प्रत्युत्तर दिले आहे. स्मिता यांच्या वकिलाने त्यांची बाजू मांडली आहे.

स्मिताच्या वकिलाचा मोठा खुलासा

ईटाइम्स टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्मिता यांच्या वकील चिन्मयी वैद्य म्हणाल्या की नीतिश यांची सर्व वक्तव्यं खोटी आहेत. त्यांनी लावलेले सर्व आरोप निराधार आणि अपमानकारक आहेत. हा अतिशय खासगी प्रश्न असून त्यामध्ये माझ्या क्लाएंटच्या मुलींचाही समावेश आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. पण तरीही आम्ही याप्रकरणी लवकरच एक अधिकृत स्टेटमेंट जारी करू, त्यामध्ये संपूर्ण सत्य (बाजू) मांडण्यात येईल. येत्या काही दिवसांतच आम्ही आमचं स्टेटमेंट देऊ. भोपाळचे पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांनी नीतिश भारद्वाज याच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत पुष्टी केली.

हे सुद्धा वाचा

IAS पत्नीवर लावले गंभीर आरोप

आम्हाला याप्रकरणी एक तक्रार मिळाली असून, डीसीपी हे भारद्वाज यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करत आहेत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की त्यांनी आणि स्मिताने 2018 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाही, त्यांची विभक्त पत्नी त्यांना त्यांच्या जुळ्या मुली, देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटण्यापासून रोखत आहे. पत्नी स्मिता हिने आपल्या मुलींचे अपहरण केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला.

फॅमिली कोर्टातही तक्रार

एका रिपोर्टनुसार, नितीश भारद्वाज यांनी त्यांची विभक्त पत्नी, स्मिता यांच्या विरोधात मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात देखील लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांच्या 12 वर्षांच्या वैवाहिक जीवनाची आणि त्यानंतर 2018 मध्ये घटस्फोट घेण्याच्या निर्णयाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. बराच काळ उलटून गेला असला तरी अद्याप नितीश-स्मिता यांचा घटस्फोट झाला नसून हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मुलींना भेटण्याची परवानगी नाकारत स्मिताने वडील म्हणून आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे असा दावाही नीतिश यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.