वधूने नेसलेली साडी, अभिनेत्रीचं प्रोड्युसरसोबतच्या लग्नाएवढीच चर्चेत

रवींद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काही जण यांना मनापासून शुभेच्छा देत आहेत. तर काही जण वींद्र चंद्रशेखरन यांना त्यांच्या लठ्ठपणामुळे ट्रोल करत आहेत. मात्र, हे दोघेही लग्न करुन आनंदी असल्याचे फोटोवरुन दिसत आहे.

वधूने नेसलेली साडी, अभिनेत्रीचं प्रोड्युसरसोबतच्या लग्नाएवढीच चर्चेत
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 11:28 PM

नवी दिल्ली : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे बोलले जाते. हे खरं ठरवणारा एक विवाह सोहळा मनोरंजन क्षेत्रात पार पडला आहे. साऊथ अभिनेत्री आणि व्हीजे महालक्ष्मीशी आणि टॉलिवूड अर्थात साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध प्रोड्युसर रवींद्र चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. यांच्या या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. लग्नात महालक्ष्मीने (Mahalaxmi) नेसलेली साडी त्यांच्या लग्नाएवढीच चर्चेत आली आहे.

महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही मित्र अशा मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत त्यांचा विवाह रितीरिवाजानुसार पार पडला. दोघांचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. महालक्ष्मीने इंस्टाग्राम लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रवींद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काही जण यांना मनापासून शुभेच्छा देत आहेत. तर काही जण वींद्र चंद्रशेखरन यांना त्यांच्या लठ्ठपणामुळे ट्रोल करत आहेत. मात्र, हे दोघेही लग्न करुन आनंदी असल्याचे फोटोवरुन दिसत आहे.

लग्नाच्या फोटोसह महालक्ष्मीने लग्नात नेसलेल्या साडीचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. लग्नात महालक्ष्मीचा ट्रेडिशनल लुक पहायला मिळत आहे. तिचा हा लुक लक्षवेधी ठरला आहे.

दाक्षिणात्य परंपरेनुसार लग्नात वधू-वरांचा पोशाख खूप खास असतो. भारतीय संस्कृतीनुसार लग्नात वधू लाल रंगाची साडी परिधान करते. ही साडी कांजीवरम असते. यावर सोनेरी जरीचे नक्षीकाम केलेले असते. महालक्ष्मीने देखील लग्नात खास लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती.

साडीला कॉन्ट्रास्ट मॅचिंग असणारा हिरव्या रंगाच्या ब्लाऊसमुळे साडी तिला खूपच खुलून दिसत आहे. या ब्लाऊजवर सोनेरी जरीकाम आहे. पारंपारिक पोशाखासह तिने हेअर स्टाईलही तशीच केली होती. तिने लांब वेनीसह केसांमध्ये गुलाब पाकळ्यांचा गरजा माळलाय. तिचा हा ट्रेनिशन लुक चाहत्यांना खुपच आवडला आहे. कमेंट्मध्ये चाहते तिच्या या वेडिंग लुकचेही कौतुक करत आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.