मुंबई : 30 डिसेंबर 2023 | संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. या वर्षात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता वर्षाअखेरीस अधिकाअधिक मनोरंजन करता यावं यासाठी 31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने दिवसभर दाखवली जाणार आहेत. रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’द्वारे सोनी मराठीवर पहायला मिळणार आहे.
या वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वर्षाअखेरीस संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे. या जत्रेतली मंडळी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. 31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदात एखादा कॉमेडी शो हा 24 तास नॉनस्टॉप दाखवण्यात येणार आहे. या खास दिवशी 500 पेक्षा जास्त एपिसोड्स दाखवण्यात येणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून हा शो सुरू होणार आहे. तो रात्री 9 पर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. गौरव मोरे, ओमकार भोजने, समीर चौघुले यांसारखे कलाकार आपल्या जबरदस्त कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.