भाऊ, गाडीवर पाय पुरतात का तुमचे ? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तूचं खोचक प्रश्नावर सणसणीत उत्तर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा घराघरात पोहोचलेला, लोकप्रिय कार्यक्रम. मनोरंजनाची, तूफान हसवण्याची गॅरंटी देणारा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. . त्यातील लोकप्रिय कलाकार असलेल्या दत्तू मोरे याने नुकताच त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याच्या पत्नीने त्याला खास गिफ्ट म्हणून बाईकही दिली.

भाऊ, गाडीवर पाय पुरतात का तुमचे ? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तूचं खोचक प्रश्नावर सणसणीत उत्तर
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 10:34 AM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरात पोहोचलेला, लोकप्रिय कार्यक्रम. मनोरंजनाची, तूफान हसवण्याची गॅरंटी देणारा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेमुळे गौरव मोरे, वनिता खरात, समीर चौघुले, ओंका राऊत, दत्तू मोरे यांसारखे कलाकार चांगलेच लोकप्रिय झाले असून त्यांची लोकप्रियता घराघरांत पोहोचली आहे. त्या कलाकारांपकी एक असलेल्या दत्तू मोरे याने नुकताच त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याच्या पत्नीने त्याला खास गिफ्ट म्हणून बाईकही दिली.

त्याचा व्हिडीओ दत्तूने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. त्यावर शेकडो लोकांच्या लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला. चाहत्यांच्या प्रेमाने भारवलेल्या दत्तूने त्यांचे आभार तर मानले. पण त्यातही एका चाहत्याने खोचक कमेंट केल्यावर, दत्तूचा हजरजबाबीपणा दिसून आला आणि त्याच्या प्रतिक्रियेचे सर्वांनीच कौतुक केले.

दत्तूला गिफ्ट मिळाली बाईक

दत्तू मोरो याने गेल्या वर्षी ( 2023 ) मध्ये गुपचूप लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यानंतर ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्याचे अनेक सहकलाकार उपस्थित होते आणि त्यांनी नवजोडप्याला शुभेच्छा दिल्या. दत्तू आणि स्वाती यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच (23 मे) साजरा केला. त्यावेळी त्याच्या पत्नीने एक नवी बाईक त्याला गिफ्ट दिली. त्याचा व्हिडीओ देखील दत्तू याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत नव्या बाईकसाठी पत्नीचे आभार मानले होते.

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

बाईकवर पाय पुरतात का हो ?

त्यावर चाहत्यांच्या लाईक्सचा, कमेंट्सचा पाऊस पडला.अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या, नव्या बाईकबद्दल अभिनंदन केलं. मात्र त्यातील एका कमेंटने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एका चाहत्याने दत्तूला शुभेच्छा तर दिल्या पण त्यासह एक खोचक कमेंटही केली. ‘ भाऊ राग नका येऊ देउ पण तुमचे पाय पुरतात का त्या गाडीहून……’ असा सवाल त्याने दत्तू याला विचारला. त्याच्या या खोचक कमेंटला दत्तू यानेही अगदी मजेशीर उत्तर दिलं. ‘हो, म्हणूनच घेतली ‘ असे लिहीत दत्तू याने हसण्याच्या अनेक ईमोजीही त्या पोस्टवर टाकल्या. दत्तू याने ही कमेंट स्पोर्टिव्हली घेतली मात्र इतरांना मात्र त्या इसमाची ही कमेंट काही आवडली नाही, काहींनी तर त्याला थेट सुनावलंही. ‘ भाऊ, कधी तरी मराठी माणसाला सपोर्ट करा की’ असं लिहीत दुसऱ्या चाहत्याने त्याला खडसावलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.