अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये होता महेश बाबूचा भाऊ, पत्नीला समजताच चप्पल घेऊन धावली; ‘हा’ व्हिडिओ पाहा…

पवित्रा महेश बाबूच्या 'सरकारू वारी पाता' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती महेश बाबूची आई बनली होती. तर नरेश हा ज्येष्ठ अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांचे पहिले पती कृष्णमूर्ती यांचा मुलगा आहे.

अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये होता महेश बाबूचा भाऊ, पत्नीला समजताच चप्पल घेऊन धावली; 'हा' व्हिडिओ पाहा...
राम्या रघुपती आणि नरेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 9:58 PM

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबू (Naresh Babu) याच्या आयुष्यात मोठ्या गडबडी सुरू आहेत. नरेश लवकरच कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तो तिसरी पत्नी राम्या रघुपतीपासून वेगळे झाल्याचेही कानी येत आहे. त्यामुळे त्यांच्या लव्ह लाइफवर एक मोठा ड्रामा तयार करण्यात आला आहे. एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, ज्यामध्ये म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये नरेशला पवित्रासोबत राम्याने रंगेहात पकडले. त्याची तिसरी पत्नी राम्या हिने नरेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ही क्लिप सोशल मीडियावर (Social media) आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नरेश आणि पवित्रा पोलीस संरक्षणात हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताना दिसत आहेत. राम्याला शिवीगाळ करताना आणि चप्पल फेकण्याचा प्रयत्न करताना नरेश दिसत आहे.

नरेश यांनी लिफ्टमधून जात असताना राम्याला फसवणूक करणारी महिला म्हटले आहे. राम्याचे राकेश शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे दोघे मिळून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी राम्याने एका मुलाखतीत सांगितले, की ते चांगले मित्र म्हणवतात, मग रात्रभर एका खोलीत एकत्र कसे राहतात? असा सवाल करत मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे. मी हिंदू कुटुंबातील आहे. मला माझ्या पतीपासून वेगळे राहणे पसंत नाही, असे राम्याने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवित्रा लोकेशने म्हैसूर पोलिसांशी संपर्क साधला असून राम्याविरुद्ध स्टॉकिंग आणि सायबर छळाची तक्रार केली आहे. अशी चर्चा आहे, की नरेश आणि पवित्रा लिव्ह इनमध्ये राहतात. अर्थात नरेश आणि पवित्रा या दोघांनीही हे अद्याप मान्य केलेले नाही. पण अनेक ठिकाणी ते एकत्र दिसतात. पवित्रा 2007मध्ये पती सुचेंद्र प्रसाद यांच्यापासून विभक्त झाली होती. दोघांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही.

पवित्रा महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती महेश बाबूची आई बनली होती. तर नरेश हा ज्येष्ठ अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांचे पहिले पती कृष्णमूर्ती यांचा मुलगा आहे. नरेशचे पहिले लग्न डान्स मास्टर श्रीनू यांच्या मुलीशी झाले होते, त्यानंतर रेखा शास्त्री आणि नंतर राम्या यांच्याशी झाले. नरेश राम्यापासून वेगळा झाला आहे. दोघांनी अद्याप अधिकृतपणे घटस्फोट घेतलेला नाही. नरेश बाबू एक अभिनेता, राजकारणी आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.