Mahima Chaudhary: तुम्ही ‘व्हर्जिन’ नसाल तर… अभिनेत्री महिमा चौधरीचा बॉलीवूडबाबत मोठा खुलासा
लोक म्हणायचे अरे ! हे डेटिंग करत आहे! त्यांना अशी अभिनेत्री हवी असायची , जी 'व्हर्जिन' आहे. आणि तिने कुणालाही 'किस्स' केले नसेल. तसेच तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला अत्यंत कमी कामे मिळत. आणि जर तुम्हाला मुले असतील तर तुमचे करिअर संपलेच म्हणून समजा.
बॉलीवूडच्या (Bollywood) झगमगाटी दुनियेत आपले करिअर करत असताना अभिनेत्र्यांना अनेक वाईट, गैर प्रकारांना सामोरे जावे लागायचे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी उघडपणे खुलासा करत त्याला वाचा फोडली आहे. यातून हॅशटॅग मीटूची चळवळ उभी राहिली. बऱ्याचदा मुलाखतीमध्ये अभिनेत्रींनी त्यांना सामोरे जाव्या लागलेल्या लैगिंक शोषण, मानसिक शोषण याबाबत खुलासा केला आहे. यातच आता 90 च्या दशकात यशस्वी अभिनेत्री म्हणून कार्यरत राहिलेल्या महिमा चौधरीने(Mahima Chaudhary) बॉलिवूडमध्ये महिलांबाबत नेमकी काय मानसिकता होती. यावर मोठा खुलासा केला आहे. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महिमाने बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात अभिनेत्रींना (Actress) कशी वागणूक दिली जात होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या जायच्या हे सांगितले आहे.
महिमा म्हणते..
90 च्या दशकात बॉलीवूड महिलांसाठी तितकी सुरक्षित नव्हती. तिथे पुरुषांची मक्तेदारी अधिक होती. पूर्वी बॉलीवूडमध्ये, एखादी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात एखाद्याला डेट करत असेल तर लोक म्हणायचे अरे ! ही डेटिंग करत आहे! त्यांना अशी अभिनेत्री हवी असायची , जी ‘व्हर्जिन’ आहे. आणि तिने कुणालाही ‘किस्स’ केले नसेल. तसेच तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला अत्यंत कमी कामे मिळत. आणि जर तुम्हाला मुले असतील तर तुमचे करिअर संपलेच म्हणून समजा. अशी स्थिती पाहायला मिळत होती. मात्र इंडस्ट्रीत खूप बदल झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता अभिनेत्रींना चांगले मानधन मिळत आहे. मोठ्या भूमिका ऑफर केल्या जात आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा करिअरवर काही ही परिणाम होत नाही. असेही ती म्हणाली आहे.
महिला केंद्रित चित्रपटांची संख्या वाढली…
अलीकडच्या काळात महिला केंद्रित चित्रपटाची संख्या बॉलीवूडमध्ये वाढली आहे. महिमाने सुभाष घई दिग्दर्शित ‘परदेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासोबत अमरीश पुरी, शाहरुख खान ही यामध्ये दिसून आले होते या. व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास महिमा लवकरच अभिनेत्री कंगना राणौतच्या पॉलिटिकल ड्रामा फिल्म ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अनुपम खेर जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत