अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी का घेतली CM योगी आदित्यनाथ यांची भेट? जाणून घ्या!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या टीमसोबत झालेल्या भेटीची झलक शेअर केली आहे.

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी का घेतली CM योगी आदित्यनाथ यांची भेट? जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:50 PM

मुंबई : अभिनेते पंकज त्रिपाठी हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसंच आता पंकज यांचा ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर या चित्रपटानिमित्त पंकज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव आणि निर्माते विनोद भानुशाली उपस्थित होते. या खास भेटीचा फोटो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाच्या टीमसोबत झालेल्या भेटीची झलक शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, आज लखनऊमध्ये प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी, निर्माते विनोद भानुशालीजी आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी भेट झाली.

दरम्यान, पंकज त्रिपाठी हे ‘मैं अटल हूं’ या चित्रपटात भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी पंकज यांचा या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. त्यांचा हा लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तसंच आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....