अजय देवगण ओटीटीचं ‘मैदान’ निवडणार? पाहा मेकर्स काय म्हणतायत…

मेकर्सनी आपल्या या निवेदनात म्हटले आहे की, 'मैदान' चित्रपटाच्या पे पर व्हूसाठी कुठल्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मशी कोणताही करार किंवा संवाद झाला नाही, हे आम्ही स्पष्ट करत आहोत. सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि सरकारने ठरवलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करून हा चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपले लक्ष आहे.'

अजय देवगण ओटीटीचं ‘मैदान’ निवडणार? पाहा मेकर्स काय म्हणतायत...
मैदान
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 4:02 PM

मुंबई : ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe)  चित्रपटाच्या यशानंतर असा अंदाज वर्तवला जात होता की, सलमान खान अभिनीत आणखी एक चित्रपट अर्थात ‘अंतिम : द फाइनल ट्रुथ’ आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर चित्रपट ‘मैदान’ (Maidan) देखील पे-पर व्हूसाठी निवडला जाऊ शकतो. मात्र, आता ‘मैदान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्व वृत्तांचे खंडन करत एक निवेदन प्रसिद्ध केले असून, चाहत्यांना या अहवालांवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले आहे (Makers declare that ajay devgn starrer Maidaan will not release on OTT platform).

मेकर्सनी आपल्या या निवेदनात म्हटले आहे की, ‘मैदान’ चित्रपटाच्या पे पर व्हूसाठी कुठल्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मशी कोणताही करार किंवा संवाद झाला नाही, हे आम्ही स्पष्ट करत आहोत. सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि सरकारने ठरवलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करून हा चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपले लक्ष आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, ‘मैदान’शी संबंधित कोणत्याही बातमीसाठी कृपया आमच्याशी थेट संपर्क साधा.

आणखी चित्रपट ओटीटीच्या मार्गावर

ओटीटीच्या रिलीजविषयी बोलताना एका स्रोताने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, ‘सूर्यवंशी’ आणि ’83’ च्या निर्मात्यांशी चर्चा होऊ शकते. या दोन्ही चित्रपटांना एका वर्षापेक्षा अधिक उशीर झाला आहे. तसेच, ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ डिजिटल रिलीझचा मार्ग स्वीकारणार होता. दरम्यान, ‘मैदान’ हा झी स्टुडिओचा चित्रपट असून, तो देखील हा मार्ग स्वीकारेल. या व्यतिरिक्त काही मोठ्या बजेटच्या दक्षिण भारतीय चित्रपटांनाही यात रस असू शकतो (Makers declare that ajay devgn starrer Maidaan will not release on OTT platform).

ओटीटी उत्तम पर्याय

दुसर्‍या स्त्रोताने सांगितले की, ‘या उद्योग विश्वाला आता कळले आहे की, एखाद्या चित्रपटाला मोठे नाव मिळाल्यास सिनेमागृहात आणि झीप्लेक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रदर्शित होणे हा एक रंजक प्रस्ताव असेल. तर झीच्या अव्वल दिग्गजांनी वेळ न घालवता बहुतेक जवळपास 4 ते 5 ओटीटी प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला. निर्माते झीशी चर्चा करत आहेत आणि हे दर्शवते की, झीपॅलेक्सला किती व्यापक स्वीकृती मिळाली आहे.’

अजय देवगणचे ओटीटीवर पदार्पण

चित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra The Edge of Darkness) नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण या सीरीजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे. हॉटस्टारच्या या स्पेशल सीरीजची निर्मिती सध्या जोशात सुरू असून, मुंबईतील बर्‍याच आयकॉनिक लोकेशन्समध्ये या सीरीजची शूटिंग होणार आहे. बर्‍याच चित्रपटांत पोलिसांची भूमिका साकारणारा अजय देवगण आता एक नवीन आणि प्रखर पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

(Makers declare that ajay devgn starrer Maidaan will not release on OTT platform)

हेही वाचा :

PHOTO | लीक झालेल्या न्यूड सीनने त्रासलेली राधिका आपटे, व्हिडीओ व्हायरल होताच घरातून बाहेर पडणे झाले होते कठीण!

PHOTO | ‘आशिकी’ चित्रपटातून घराघरांत पोहोचली, एक अपघाताने रातोरात बदललं अनु अग्रवालचं आयुष्य!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.