रणबीरच्या Animal Park मधून बॉबी देओलचा पत्ता कट ? सीक्वेलमध्ये नवा व्हिलन कोण ?
संदीप रेड्डी वांगाने दिग्दर्शित केलेल्या रणबीर कपूरच्या ॲनिमलने जगभरात धुमाकूळ माजवला. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल, कमाईदेखील खूप केली. आता या चित्रपटानंतर रणबीर कपूर 'रामायण'च्या तयारीत व्यस्त आहे. पण ॲनिमलचा सीक्वेल ॲनिमल पार्क बनवण्याचा मेकर्सचा प्लान आहे. या चित्रपटात बॉबी देओलचं कॅरॅक्टर पुन्हा जिवंत करण्याचाही मेकर्सचा विचार होता, मात्र आता यासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे.
मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : अभिनेता रणबीर कपूरसाठी 2023 हे वर्ष उत्तम गेलं. 1 डिसेंबरला आलेल्या त्याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने जहभरात धूमाकूळ घातला. प्रचंड कमाई करत त्याने बॉक्स ऑफीसवरही वर्चवस्व गाजवलं. चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफीसवर 915 कोटीचा कारभार केल्याचेही वृत्त आहे. या पिक्चरमध्ये रणबीरशिवाय आणखी एका अभिनेत्याने सर्वांचे लक्ष वेधले, तो म्हणजे बॉबी देओल. छोटासा रोल, पण त्याने खणखणीत अभिनयाने सर्वांनाच थक्क केलं. त्याचा व्हिलन अनेक लोकांना आवडला. आता सर्वांनाच ॲनिमल पार्कची उत्सुकता आहे. पण पहिल्या भागत बॉबी देओल ज्याची भूमिका साकारत होता, त्याचा मृत्यू होता. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की त्याला पुन्हा जिवंत केलं जाईल. मात्र आता या चित्रपटासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.
सध्या निर्माते ‘ॲनिमल पार्क’चे प्लानिंग करत आहेत, पण त्याबद्दल काहीच फायनल झालेलं नाही. पण आता अशी बातमी समोर आली आहे की या चित्रपटातील व्हिलनच्या भूमिकेसाठी बातमी येत आहे की, दुसऱ्या अभिनेत्याशी संपर्क साधण्यात आला आहे, तो म्हणजे सुपरस्टार अभिनेता विकी कौशल.
रणबीरच्या ‘ॲनिमल पार्क’मध्ये व्हिलनची एंट्री !
काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या डार्क थ्रिलर ‘ॲनिमल पार्क’मध्ये नव्या व्हिलनची एंट्री होणार आहे, त्या भूमिकेसाठी विक्की कौशल याला ॲप्रोच करण्यात आलं आहे. संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून भूषण कुमार त्याचे प्रोड्यूसर आहेत. एवढंच नव्हे तर या सीक्वेलमध्ये रणबीर कपूरचा डबल रोल असणार आहे, अशीदेखील चर्चा सुरू आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोमतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या चित्रपटातील व्हिलनच्या रोलसाठी विक्की कौशलसोबतच शाहिद कपूरच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे, त्यांच्यापैकी कोण आता हा व्हिलन साकारेल हे लवकरच समजेल. जर विक्की कौशल या भूमिकेसाठी तयार झाला, तर त्याचा हा कारकिर्दीतील पहिला निगेटीव्ह रोल असेल. मात्र याबाबत मेकर्स किंवा अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आगामी चित्रपटाच्या तयारीत विकी कौशल
‘उरी’ असो, ‘राझी’ किंवा ‘उधम सिंग’ अथाव ‘सॅम बहाद्दूर’ , विकी कौशलने प्रत्येक पात्र यशस्वीपणे साकारत त्याच्या चाहत्यांना प्रभावित केले. मात्र, सध्या तो त्याच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात तो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि शूर योद्धा छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारत आहे. यासाठी तो मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहे, त्याने त्याचा वजनही वाढवलं आहे. तसेच ॲक्शन सीन्ससाठी तो कसून तयारी करत असून सध्या तो तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकत आहे.