अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत स्टायलिश अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. मात्र बोल्ड लूकमुळे अनेकदा तिच्यावर 'सेक्स सिम्बॉल'ची टिप्पणी केली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने यावर मौन सोडलं आहे.
"मला उलट सेक्स सिम्बॉल म्हटलेलं आवडतं. सेक्स सिम्बॉल म्हटल्यामुळे मी काही नाराज होत नाही. मला प्लेन जेन (अनाकर्षित) म्हणण्यापेक्षा सेक्स सिम्बॉल म्हटलेलं केव्हाही चांगलं वाटतं. मी उलट खुश आहे आणि मला तो टॅग आवडतो", असं मलायका म्हणाली.
इंडस्ट्रीत फक्त लूकच महत्त्वाचं नसतं हे स्पष्ट करताना ती पुढे म्हणाली, "या इंडस्ट्रीत काही गाणी आणि आयटम साँग्सपेक्षा अधिक माझं अस्तित्त्व आहे. त्यापेक्षा मी बरंच काही काम केलंय."
"एखादी व्यक्ती सुंदर दिसते, चांगली नाचते म्हणून इंडस्ट्रीत टिकून राहत नाही. या इंडस्ट्रीत 30 वर्षांहून अधिक काळ टिकून राहणं सोपं नाही. फक्त दिसण्याच्या आधारे तुम्ही टिकूच शकत नाही", असं मत तिने मांडलं.
मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. विविध मुलाखतींमध्ये ती पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.