दुसरं लग्न कधी करणार? मुलाच्या प्रश्नावर मलायकाने दिलेलं उत्तर चर्चेत

Malaika Arora : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या लग्नाबाबत बऱ्याच अफवा उठतात पण दोघांनी त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता थेट मलायकाच्या मुलानेच तिला लग्नाबाबत प्रश्न विचारलाय.. त्यावर काय म्हणाली अभिनेत्री ?

दुसरं लग्न कधी करणार? मुलाच्या प्रश्नावर मलायकाने दिलेलं उत्तर चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 10:04 AM

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांच्या घटस्फोटाला बराच काळ उलटून गेला असून दोघांनीही आयुष्यात मूव्ह-ऑन केलंय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अरबाजने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं. तर मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्येच कधीतरी त्या दोघांच्या ब्रेकअपबद्दल अफवा उठतात, तर कधी त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होते. मात्र मलायका आणि अर्जुन दोघांनीही त्याबद्दलचं मौन काही सोडलेलं नाही. मात्र मलायकाला आता पुन्हा एकदा लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असून यावेळी तिच्या मुलानेच तिला ही विचारणा केली आहे. त्यावर अभिनेत्री काय म्हणाली , तेही जाणून घेऊया..

लग्नाच्या प्लानिंगबद्दल काय म्हणाली मलायका ?

खरंतर मलायका नुकतीच डंब बिरयानी या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून आली होती. रॅपिड-फायर राऊंडदरम्यान अरहानने त्याच्या आईला तिच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल प्रश्न विचारला. तू कोणत्या तारखेला, कुठल्या जागी आणि कोणाशी लग्न करणार आहेस ? असा थेट सवाल अरहानने मलायकाला विचारला. मात्र त्यावर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराची सध्या बरीच चर्चा आहे. अरहानचा प्रश्न ऐकल्यावर मलायका म्हणाली की, मी सध्या या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही आणि त्याऐवजी ( उत्तर देण्याऐवजी) तिने मिरची खाण्याचा ऑप्शन निवडला. सध्या मी माझं आयुष्य उत्तमरित्या जगत आहे, असंही मलायकाने स्पष्ट केलं.

मलायका- अर्जुनचं नातं

बॉलिवूड दिवा मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे दोघेही प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या केमिस्ट्रीची झलक शेअर करण्यास ते कधीच मागेपुढे पाहत नाही. पण जेव्हा त्यांना त्यांच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल प्रश्न विचारला जातो, तेव्हा तेव्हा मलायका आणि अर्जुन दोघेही मौन सोडचृत नाहीत. त्यांचे चाहते मात्र दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मलायका अरोरा -अरबाज खानचा घटस्फोट

19 वर्षांच्या संसारानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. 2002 साली त्यांचा मुलगा अरहान खानचा जन्म झाला. 19 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर मलायका-अरबाजने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अलीकडेच मलायका ही अरबाज आणि त्याची दुसरी पत्नी शूरासोबत डिनर डेटवरही दिसली होती.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा वर्क फ्रंट

अभिनेता अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच अभिनेता रोहित शेट्टीच्या कॉप्स युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि इतर अनेक स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आणि मलायका अरोराच्या कामाबद्दल सांगायचं तर ती अलीकडेच अर्शद वारसी आणि फराह खान यांच्यासोबत डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा सीझन 11 मध्ये जज म्हणून दिसली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.