तुझ्या आईचा फोन नंबर दे रे… घाणेरडे इशारे करताच मलायका भडकली तरुणावर; Video व्हायरल
Malaika Arora Scolds Dancer : मलायका अरोरा हिने तिचा मुलगा अरहान खानला एका पॉडकास्टमध्ये त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल प्रश्न विचारून अस्वस्थ केले होते, परंतु आता एका 16 वर्षाच्या मुलामुळे एका डान्स शोमध्ये ती अस्वस्थ झाली. त्या मुलाला तिने भर शो मध्येच सुनावलं. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी तिची बाजू घेतली, मात्र काही युजर्सनी थेट तिलाच सुनावलं.

बॉलिवूडमधील स्टार, मलायका अरोरा ही एक उत्तम डान्सर असून तिच्या अदांनी, नृत्याने ती लोकांना घायाळ करते, तिचे अनेक चाहतेही आहेत. सध्या ती ‘हिप हॉप इंडिया’ या टीव्ही शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. बिनधास्त अंदाज आणि खासगी जीवनामुळेही मलायका नेहमीच चर्चेत असते. ती जेव्हा स्टेवर येते तेव्हा सर्वजण तिच्या सौंदर्यावर , अदांमुळे घायाळ होता. असंच काहीस घडलं जेव्हा डान्स शो मध्ये एका मुलाने तिला पाहून काही इशारे केले. पण ते पाहून मलायका खूपच अस्वस्थ झाली होती. आणि तिने थेट त्या मुलाकडून त्याच्या आईचा नंबर मागितला आणि तिला कॉल करण्याची धमकी दिली.
सध्या एका डान्स शोमधील मलायका अरोराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका 16 वर्षांच्या मुलाला ओरडताना दिसली. तो डान्स करताना तिच्याकडे पाहून चुकीचे हावभाव करत होता, असा तिचा दावा होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मलायकाच्या प्रतिक्रियेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मलायका त्या मुलाला म्हणाली, ‘मला तुझ्या आईचा फोन नंबर दे. हा फक्त 16 वर्षांचा मुलगा आहे, नाचतोय. माझ्याकडे बघून तो वाह म्हणतोय.’ पण ते ऐकून त्याने मान खाली घातली. मात्र ते पाहूनही मलाकयाने त्याला ओरडणं बंद केलं नाही. ‘ हा मला पाहून डोळा मारतोय, फ्लाईंग किस देतोय.’ त्याची ही कृती अयोग्य असल्याचं शोमधील इतर स्पर्धकांनीही म्हटलं. ‘मलायका त्याला ओरडली, ते योग्यच होतं. त्याने असं करणं चुकीचं होतं, असं वागण्याचं त्याचं वय तरी आहे का ?’ असं म्हणत अनेकांनी मलायकाच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला.
View this post on Instagram
नेटीजन्सनी सुनावलं
हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झआला आहे, पण त्यावर नेटीजन्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. तिचं बरोबर आहे, असं काहीचं म्हणणं होतं. पण काहींना तिचं वागणं दुटप्पी वाटलं. ‘ एका पॉडकास्टमध्ये मलायका तिच्या मुलासोबत व्हर्जिनिटीच्या मुद्यावर बोलू शकते. आता तीच सुनावत्ये, हे तर दुटप्पी आहे, पाखंडी वागणं आहे’ असं एका युजरने सुनावलं. ‘ जिने मुन्नी बदनाम हुईवर डान्स केलं तीच आता त्या मुलाला सुनावत्ये’ असं म्हणत आणखी एका नेटकऱ्याने तिच्यावर टीका केली. हिचे ओव्हरॲक्टिंगचे पैसे कापा, अशी कमेंटही एकाने केली.
खरंतर, काही काळापूर्वी एका पॉडकास्टमध्ये मलायका अरोराने तिचा मुलगा अरहान खानच्या व्हर्जिनिटीवर प्रश्न विचारला होता. त्याया प्रश्नाने मुलगा अस्वस्थ झाला, पण नंतर त्याने दोन पावले पुढे जाऊन आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 19 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 51 वर्षांच्या मलायका अरोराने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतरती अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये होती मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं.