Malaika Arora : मलायका अरोराला अरबाज खानकडून मिळालं खास गिफ्ट, व्हिडीओ केला शेअर

मलाईकाने असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका खास गिफ्टचा आहे. महत्वाची बाब म्हणजे हे खास गिफ्ट तिला तिच्या Ex नवऱ्याने म्हणजे अभिनेता अरबाज खानने दिलं आहे.

Malaika Arora : मलायका अरोराला अरबाज खानकडून मिळालं खास गिफ्ट, व्हिडीओ केला शेअर
अरबाज खानकडून मलाईका अरोराला खास गिफ्ट
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 6:43 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिसनेस आणि सोशल मीडियावरील अॅक्टिव्हनेसमुळे सातत्याने चर्चेत असते. मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी ट्रेंड होत असतात. मलाईकाने असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका खास गिफ्टचा आहे. महत्वाची बाब म्हणजे हे खास गिफ्ट तिला तिच्या Ex नवऱ्याने म्हणजे अभिनेता अरबाज खानने दिलं आहे. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण खुद्द मलायकानेच याबाबत माहिती दिली आहे.(Special gift from actor Arbaaz Khan to actress Malaika Arora)

अरबाज खान आणि मलायका हे विभक्त झाले आहेत. असं असलं तरीही अरबाज खानने मलायकाला एक भेट दिली आहे. ही भेट एखादी महागडी वस्तू किंवा दागिना नाही तर आंब्याची पेटी आहे. मलायकाने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत आंब्याच्या पेटी दाखवली आहे. इतकच नाही तर या खास गिफ्टसाठी मलायकाने अरबाजचे आभारही मानले आहेत.

आंब्याची पेटी

अरबाज खानकडून मलायका अरोलाला खास भेट

मलायका आणि अरबाजचा डिव्होर्स

तुम्हाला माहितीच असेल की, मलायका आणि अरबाज यांनी आपल्या 18 वर्षाच्या संसारानंतर डिव्होर्स घेतला आहे. त्यांनी एकमेकांपासून फारकत का घेतली? त्यांच्या विभक्त होण्यामागे नक्की काय कारण आहे? हे अद्याप खात्रीशीरपणे समोर आलेलं नाही. मात्र, असं सांगितलं जातं की ते दोघे एकमांसोबत आनंदी नव्हते आणि त्यातूनच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दोघांचाही नवा जोडीदार

डिव्होर्सनंतर मलायकाचं नाव अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं. त्या दोघांनीही या नात्याबाबत काही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. तर अनेकदा अनेक ठिकाणी हे दोघे एकमेकांसोबत पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अरबाज खानलाही Giorgia Andriani च्या रुपात नवा जोडीदार मिळाला. अरबाज आणि Giorgia Andriani हे दोघे तसं पाहायला गेलं तर जास्ती चर्चेत नसतात. किंबहुना त्यांनी स्वत:ला चर्चांपासून दूरच ठेवणं पसंत केलं आहे. पण मलायका आणि अर्जुन कपूर सातत्याने लाईमलाईटमध्ये असतात. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे.

मलायका आणि अर्जुन कपूरला अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. हे कपल सिक्रेट व्हॅकेशनवरही दिसून येतं. आपलं प्रेम तर त्यांनी कधीच जाहीर केलं आहे. पण आता लग्नाची तयारीही सुरु असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात.

इतर बातम्या :

Tejas | कंगनाच्या वाढदिवशी चाहत्यांना आणखी एक खास भेट, ‘तेजस’ नवा लूक प्रदर्शित!

PHOTO | दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर ‘बेबो’ पुन्हा शूटला हजर, फिट लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!

Special gift from actor Arbaaz Khan to actress Malaika Arora

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.