मलायका अरोरा, जेनेलिया ते श्रद्धा कपूर… या सेलिब्रिटींनी लावली Backstreet Boys च्या कॉन्सर्टला हजेरी
अभिनेत्री श्रद्धा कपूर, मलायका अरोरा, मिथीला पालकर यांसह अनेक सेलिब्रिटींनी मुंबईतील बॅकस्ट्रीट बॉईजची कॉन्सर्ट एन्जॉय केली.
मुंबई : बॅकस्ट्रीट बॉईज (Backstreet Boys) या लोकप्रिय अमेरिकन बॉय बँडची गुरूवारी मुंबईत कॉन्सर्ट होती. 90च्या दशकात गाजलेल्या या बँडची लोकप्रियता अजूनही कायम असून त्यांची गाणी अनेकांच्या ओठांवर असतात. बीकेसीमध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी हजारो फॅन्सनी (fans )हजेरी लावली होती. एवढंच नव्हे तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही या (bollywood celebrity) कॉन्सर्टला उपस्थित होते.
अभिनेत्री श्रद्धा कपूर, मलायका अरोरा, जेनिलिया डिसूजा, मिथीला पालकर, डायना पेंटी, जॅकलीन फर्नांडिस, अभिनेता वरूण धवनची पत्नी नताशा, सलमान खआनची बहीण अर्पिता, कांची कौल, मनीष पॉल, क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितीका यांसह अनेक सेलिब्रिटी हजर होते. आणि त्या सर्वांनीच बीकेसी येथील जिओ गार्डन येथे झालेल्या बॅकस्ट्रीट बॉईजची कॉन्सर्ट एन्जॉय केली. यापैकी अनेकांनी सोशल मीडियावरही या कॉन्सर्टचे फोटो, व्हिडीओ टाकून आपण त्याचे फॅन असल्याचे नमूद केले
View this post on Instagram
या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. I want it that way, The Call आणि Don’t want you back या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाणी सादर करत कॉन्सर्ट दणाणून सोडली. त्याच्या गाण्यांनी फॅन्सना अक्षरश: भुरळ घातली.
तब्बल 13 वर्षांनंतर या बँडने भारतात सादरीकरण केले. बुधवारी या बँडचे गायक मुंबईत दाखल झाले. बँड सदस्य निक कार्टरने एक व्हिडिओ शेअर करत मुंबईतील एका हॉटेलमध्ये कसे स्वागत झाले ते नमूद केले होते.