Video | फिटनेससाठी काहीही! वयाच्या 49व्या वर्षीही अवघड ‘हँडस्टँड’ करताना दिसली मंदिरा बेदी, पाहा व्हिडीओ…  

अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसते. वयाच्या 49व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते.

Video | फिटनेससाठी काहीही! वयाच्या 49व्या वर्षीही अवघड ‘हँडस्टँड’ करताना दिसली मंदिरा बेदी, पाहा व्हिडीओ...  
मंदिरा बेदी
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:16 AM

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसते. वयाच्या 49व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती लोकांना देखील प्रेरित करत असते. यावेळी, मंदिरा लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या टिप्स देण्यात आणि मदत करण्यात गुंतली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना योग्य माहिती देत ​​राहते (Mandira Bedi share head stand video on social media).

मंदिरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो ती शोषल मीडियावर शेअर करत असते. मंदिराचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच चर्चेत येतात. तिने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘हँडस्टँड’ हा अवघड योगाप्रकार करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पाहा मंदिरा बेदीचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

या व्हिडीओमध्ये मंदिरा तिच्या लिव्हिंग रूममध्ये हँडस्टँड करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाच्या ब्रालेटसह योग पँट परिधान केली आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही माझी रोजची दिनचर्या आहे. दररोज कधीकधी 10 किंवा कधीकधी 20 आणि कधीकधी मी बराच वेळ भिंतीच्या सहाय्याशिवाय हे करू शकते. कोणताही दबाव येत नाही.’ मंदिराचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

मंदिरा बेदी यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री मौनी रॉय हिने देखील एक इमोजी पोस्ट केली आहे, तर मंदिराचे चाहते तिला कौतुकाची थाप देत आहेत (Mandira Bedi share head stand video on social media).

शेअर केला बिकिनीमधला व्हिडीओ

अलीकडेच मंदिरा बेदीने बिकिनीमध्ये योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, घरातच ऑक्सिजनची पातळी कशी वाढवता येईल, हे देखील सांगितले. मंदिरा तिच्या चाहत्यांना योगा करण्यास प्रोत्साहित करत असते. हा व्हिडीओ सामायिक करताना मंदिराने लिहिले आहे, ‘ऑक्सिजनची पातळी वाढवा, आपल्या तणावाची पातळी कमी करा, आपला पाठीला आणि खांद्यांना बळकट करा.’

मंदिरा बेदी यांना दोन मुले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलगी दत्तक घेण्याविषयी माहिती दिली होती. त्यानंतर तिला ट्रोलही केले गेले होते, पण मंदिराने योग्य ते उत्तर देऊन अशा लोकांची तोंडं बंद केली होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, मंदिरा लवकरच ‘सिक्स’ या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

(Mandira Bedi share  head stand video on social media)

हेही वाचा :

मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!

अजय देवगण ओटीटीचं ‘मैदान’ निवडणार? पाहा मेकर्स काय म्हणतायत…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.