मुंबई : मनीष पॉल हा एक अभिनेता असण्यासोबतच तो अनेक शो होस्ट करतो. शो होस्ट करत असताना उपस्थितांचे जोरदार मनोरंजन करताना देखील मनीष पॉल (Maniesh Paul) हा कायमच दिसतो. मनीष पॉल याने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. इतकेच नाही तर अनेक मोठ्या बाॅलिवूडच्या (Bollywood) पुरस्कार सोहळ्यांना देखील होस्ट करताना कायमच मनीष पॉल हा दिसतो. सोशल मीडियावर मनीष पॉल याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. विशेष म्हणजे आता मनीष पॉल हे एक अत्यंत मोठे नाव आहे. मनीष पॉल हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
आता नुकताच मनीष पॉल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे मनीष पॉल हा चर्चेत आलाय. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा करताना मनीष पॉल दिसलाय. विशेष म्हणजे तब्बल दहा वर्षांनंतर त्याने यावर भाष्य केले आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील किस्सा हा मनीष पॉल सांगताना दिसतोय. हे सांगताना मनीष पॉल हा भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले.
मनीष पॉल म्हणाले की, हा किस्सा साधारण दहा पूर्वीचा आहे. एक पुरस्कार सोहळा होता आणि बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा स्टेजवरून खाली येत असताना मी त्याला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या जवळ गेलो. मात्र, त्यावेळी अत्यंत रागामध्ये मला शांत बसण्यास अक्षय कुमार याने सांगितले. त्यानंतर मला खूप जास्त वाईट वाटले.
विशेष म्हणजे त्या पुरस्कार सोहळ्यात माझी आई उपस्थित होती. पहिल्यांदाच माझी आई अशा कोणत्या तरी कार्यक्रमात आली होती आणि तिच्यासमोरचा माझा अपमान करण्यात आला. यामुळे मी खूप जास्त दु:खी झालो. दोन मिनिटे मला काय बोलावे हेच कळत नव्हते. ते माझे सुरूवातीचे दिवस होते.
मला वाटले की, आता माझ्या करिअरचे काहीच होणार नाही. मात्र, मी त्यानंतर माझा शो पुढे व्यवस्थित केला. मी अक्षय कुमारला याबद्दल बोललो की, सर मी तुम्हाला दुसरे काहीच बोलणार नव्हतो. फक्त अभिनयाच्या टिप्स या तुमच्याकडून घेणार होतो. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर अक्षय कुमार म्हणाला की, मी फक्त मजाक करत होतो. पण मला माहितीये की, ते अजिबातच मजाक हे करत नव्हते.