मनोरंजनाची मेजवानी मिळणार, मनोज बाजपेयीची ‘The Family Man 2’ सीरीज लवकरच प्रदर्शित होणार!

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांची वेब सीरीज 'द फॅमिली मॅन'  (The family man 2) वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

मनोरंजनाची मेजवानी मिळणार, मनोज बाजपेयीची ‘The Family Man 2’ सीरीज लवकरच प्रदर्शित होणार!
मनोज बाजपेयी
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 10:36 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’  (The family man 2) वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर या वेब सीरीजचा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारी महिन्यात चाहत्यांची प्रतीक्षा काहीशी कमी झाली होती आणि त्याचा टीझर देखील प्रदर्शित झाला होता. यानंतर प्रत्येकजण वेब या सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहे. ‘तांडव’ सीरीजदरम्यान झालेल्या उलथापालथानंतर या वेब सीरीजचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता ही वेब सीरीज जून महिन्यात रिलीज होणार आहे (Manoj Bajpayee The family man 2 web series will released in month of june).

ही वेब सीरीज कधी प्रसिद्ध होणार आहे, याची घोषणा या वेब सीरीज निर्माते राज निधिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, आम्हाला माहित आहे की आपण ‘द फॅमिली मॅन’च्या नवीन हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहात. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल खूप आभारी आहोत. आमच्याकडे आपल्यासाठी एक नवी अपडेट आहे. ‘फॅमिली मॅन सीझन 2’ या उन्हाळ्यात अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. हा सीझन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बरेच काम करत आहोत. आशा आहे की तुम्हाला हे खूप आवडेल.

लवकरच होणार अधिकृत घोषणा

पिंकविलाच्या अहवालानुसार, ‘द फॅमिली मॅन 2’ या जूनमध्ये रिलीज होणार आहे. मेकर्स राज आणि डीके यांच्यासह अ‍ॅमेझॉन प्राइम लवकरच या शोच्या अंतिम तारखेची घोषणा लवकरच करणार आहेत (Manoj Bajpayee The family man 2 web series will released in month of june).

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी ही देखील मनोज बाजपेयीसमवेत ‘द फॅमिली मॅन सीझन 2’मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडेच तिच्या वाढदिवशी निर्मात्यांनी सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेब सीरीजमध्ये आता समंथाच्या नावाची वर्णी लागली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सॅम आणि हे वर्ष आनंदाने भरुन जाईल. राजीला या जगात आणण्याची आता वाट बघवत नाही.’

चाहत्यांना आवडला टीझर

‘द फॅमिली मॅन 2’ चा टीझर अप्रतिम आहे. ज्यामध्ये मनोजची बदललेली स्टाईल पाहायला मिळत आहे. यावेळी प्रेक्षक मूसा जिवंत आहेत की मृत, हे जाणून घेण्याची प्रतीक्षा करत आहेत. या सीरीजमध्ये भयानक दहशतवादी मूसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. त्याच्या भूमिकेसाठी नीरजला बरीच वाहवाहसुद्धा मिळाली होती.

(Manoj Bajpayee The family man 2 web series will released in month of june)

हेही वाचा :

Death Rumour | नव्वदच्या दशकांत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा, चाहतेही हैराण!

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण, प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटर सपोर्ट

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.