अभिनेत्रींना स्पर्शही करायचे नाहीत मनोज कुमार; काय होतं कारण?
1960 च्या दशकात कारकिर्दीच्या शिखरावर असलेले मनोज कुमार यांचे निधन झाले. दरम्यान, त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही एक आदर्श बनल्या आहेत. यापैकी एक म्हणजे त्यांनी कधीही अभिनेत्रींनी स्पर्श करणे टाळले आहे. पण का? कारण जाणून आश्चर्य वाटेल.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप योगदान दिलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या चित्रपटांनी लोकांच्या मनावर राज्य केलं.
मनोज कुमार हे एक अतिशय प्रभावशाली अभिनेते होते
मनोज कुमार यांचे नाव महान कलाकारांमध्ये गणले जाते. ते अशा अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि प्रतिमेने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. मनोज कुमार हे एक अतिशय प्रभावशाली अभिनेते होते जे 1970 च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचले. त्यांनी चित्रपटसृष्टीत एक असा आदर्श ठेवला जो नेहमीच लक्षात राहील. मनोज कुमार हा एक असा अभिनेता होता जो पडद्यावर नायिकेला स्पर्श करणे टाळत असे. होय ते अभिनेत्रींना स्पर्श करणं टाळण्याचा प्रयत्न करायचे.
प्रतिमा जपणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं.
मनोज कुमार यांचे पडद्यावरचे व्यक्तिमत्व खूप खास होते. त्यांनी नेहमीच त्यांच्या पात्रांमध्ये भारतीयत्व, देशभक्ती आणि साधेपणा जपला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भारताच्या प्रतिमेला प्राधान्य दिले. मनोज कुमार कोणत्याही चित्रपटात त्यांच्या नायिकांशी अंतर ठेवत असे.मनोज कुमार यांना त्यांची प्रतिमा जपणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं.
अभिनेत्रीसोबत रोमँटीक सीन करणं टाळले
त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की एखाद्या अभिनेत्रीला स्पर्श करणारा सीन करणे योग्य ठरणार नाही. त्यांना आपला अभिनय हा पडद्यावर दाखवलेल्या समाज आणि देशाच्या आदर्शांचे प्रतीक बनावा अशी त्याची इच्छा होती. हे लक्षात घेऊन, त्यांनी 1974 मध्ये आलेल्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील एका विशिष्ट दृश्याच्या शूटिंग दरम्यान एक रोमँटिक दृश्य करण्यास नकार दिला. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल,असं म्हणत त्यांनी पडद्यावर रोमँटीक सीन करणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला आहे.