Video: ‘गद्दारी करुन… ५० खोके एकदम ओक्के’, अजितदादांची मिमिक्री? म्हणत किरण मानने शेअर केला व्हिडीओ व्हायरल
Video: किरण मानेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. आता नेमका काय आहे व्हिडीओ चला जाणून घेऊया...

कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली. तेव्हापासून कुणाल कामरा वादात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची या प्रकरणी चौकशी केली. त्यानंतर कुणाल कामरा हा तामिळनाडूमध्ये असल्याचे एका ऑडीओ क्लिपमधून समोर आले. दरम्यान, मराठमोळा अभिनेता किरण माने याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. किरण मानने कुणाल कामराच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
किरण मानेने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘अजितदादांची मिमिक्री?! कोण हाय ह्यो एडिटर ? आज होळी असल्याचा फील आणलाय कुणाल कामरानं.. सगळा सोशल मिडिया खदाखदा हसतोय… भक्तपिलावळ कोमात’ असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: ‘तो BJP जॉईन करतोय’, रितेश देशमुखचा मंत्रालयाच्या बाहेरील फोटो पाहून मुंबईकर आवाक




काय आहे व्हिडीओ?
व्हिडीओमध्ये कुणाल कामरा दिसत आहे. पण कुणाल कामराचा हा व्हिडीओ एडीट करून त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवाज देण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये, ‘गद्दारी करून, ५० खोके एकमद ओक्के… बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागलं आहे ५० खोके एकदम ओक्के… तुमच्या इथे व्हाय व्हाय व्हाय करायला लागला सायरन की लोक म्हणतात ५० खोकेवाला चालला आहे… तो गद्दार चाललाय… मी म्हणत नाही लोक म्हणतायेत’ असे अजित पवार यांच्या आवाजात कुणाल कामरा बोलत असल्याचे भासवले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काय आहे वाद?
कुणालच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, “जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केलंय ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,” तो असे विनोदी शैलीत बोलला. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने हे गाणं लिहिलंय.