तू मुंबईचा नाही…तुला लोकांनी कधी दूजाभाव करुन वागवलं का? संकर्षण कऱ्हाडेचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक
संकर्षण कऱ्हाडे यांचे नवीन मराठी नाटक "कुटुंब किर्तन" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या घोषणेसाठी जितेंद्र जोशी यांना त्यांनी निवडले. कऱ्हाडे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जोशी यांचे आभार मानले आहेत.

मराठी कलाविश्वात नाटक, संगीत, चित्रपट याची खूप मोठी परंपरा आहे. सध्या अनेक नवनवीन चित्रपट, नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कुटुंब किर्रतन’ असे त्याच्या आगामी नाटकाचे नाव आहे. या नाटकाच्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने एक किस्सा सांगितला आहे. यासोबतच त्याने अभिनेता जितेंद्र जोशीचे आभार मानले आहे.
संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत संकर्षण कऱ्हाडे आणि जितेंद्र जोशी हे व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या पोस्टद्वारे संकर्षण कऱ्हाडने जितेंद्र जोशीबद्दल किती आदर वाटतो, त्याबद्दल सांगितले आहे.
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
“जितेंद्र जोशी …” आभार मानायला शब्दं नाहीत … नाटकासाठीचा अत्यंत महत्वाची… नाटकापूर्वी रंगमंदिरात वाजते ती अनाऊन्समेंट…“कुटुंब किर्रतन” नाटकाची अनाऊन्समेंट कुणी करावी कुणी करावी असं सुरू असतांना मनांत जितेंद्र जोशी हे नाव आलं… दामले सरांच्या कानावर घातलं तेही एका क्षणांत म्हणाले ड्डन … सकाळी ११ वा. जितेंद्र जोशींना मी फोन केला म्हणालो दादा करशील का रे …?
आम्ही कधीच एकत्रं काम केलं नाही… भेटून शेक हॅंड सुद्धा आमचा कधी झाला नाहीये… पण , पलिकडून उत्तर … “मित्रा …… करीन कि रे …” मी म्हणालो कधी वेळ मिळेल तुला ? उत्तर … आजच जातो… लिहिलेली अनाऊन्समेंट पाठवली … त्यात मोलाची भर घालून जोशी बूवांनी जी काही रंगत आणलीये… ती तुम्हाला नाटकाच्या आधी ऐकायला मिळेल …मी फोन ठेवतांना म्हणालो कसे आभार मानू…? उत्तर आलं… नकोच मानू… कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल त्याला अशीच साथ दे … मी निःशब्दं…
काय बोलायचं …??? नाटक धर्माला जागणारी ही वृत्ती शिकवून येत नाही…मला खूपदा लोक विचारतात “तू मुंबईचा नाही… तुला लोकांनी कधी दूजाभाव करुन वागवलं का …???” त्याचं हे उत्तर… मला ह्या शहरानं , माझ्या कामानं अशी माणसं दिली जी एका भेटीत एक ४०० पानांचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतात… मी हे कध्धीही विसरणार नाही …“जितेंद्र जोशी …” तुम्ही कम्माल केलीत, असे संकर्षण कऱ्हाडे म्हणाला.
View this post on Instagram
संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर अभिनेता जितेंद्र जोशीनेही प्रतिक्रिया दिली. मित्रा!! मलाच इतकी मजा आली की काय सांगू!! जोरदार होऊ देत नाटक, असे जितेंद्र जोशी म्हणाला. त्यासोबतच त्याच्या या पोस्टवर इतर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. आवडत्या कलाकारांपैकी एक, तुम्ही दोन्ही माणसे माणूस म्हणून अस्सल बावनकशी सोने आहात, अशा कमेंट या पोस्टखाली पाहायला मिळत आहे.