सिद्धार्थ चांदेकरच्या आईने 57 व्या वर्षी का घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय, म्हणाल्या, ‘कुठल्या गरजांसाठी नाही तर…’

| Updated on: Oct 11, 2024 | 12:34 PM

Seema Chandekar on second Marriage: वयाच्या 57 व्या वर्षी सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, दुसऱ्या लग्नानंतर सीमा चांदेकर म्हणाल्या, 'कुठल्या गरजांसाठी नाही तर...', सीमा चांदेकर यांच्या दुसऱ्या लग्नानंतर रंगल्या होत्या सर्वत्र चर्चा...

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने 57 व्या वर्षी का घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय, म्हणाल्या, कुठल्या गरजांसाठी नाही तर...
Follow us on

‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘आनलाईन बिनलाईन’, ‘गुलाबजाम’, ‘क्सालमेट’, ‘वजनदार’, ‘झेंडा’ असे अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिद्धार्थ याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठ आहे. सांगायचं झालं तर, सिद्धार्थ त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतोच पण अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. दरम्यान, आईच्या दुसऱ्या लग्नानंतर सिद्धार्थ चर्चेत आला होता. स्वतः सिद्धार्थ याने आईचं दुसरं लग्न मोठ्या थाटात केलं होतं. सिद्धार्थ याने घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक देखील केलं. आता सिद्धार्थच्या आई सीमा चांदेकर यांनी दुसऱ्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सीमा चांदेकर यांनी दुसऱ्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करण्यासाठी देखील अनेक वर्ष लागली. मुल त्यांच्या आयुष्यात पुढे गेली आहेत. त्यांचं सगळं काही झालं आहे म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला असं नाही. माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत होती. म्हणून एकटं वाटण्यासारखं देखील काहीही नव्हतं.’

हे सुद्धा वाचा

 

 

‘तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता. त्यामुळे माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. मला कुठे जाता देखील येत नव्हतं. सिद्धार्थ आणि सुमेधा मला येऊन भेटायचं. फोन, व्हिडीओ कॉलवर आमचं बोलणं देखील व्हायचं. त्यामुळे एकटेपणा जाणवत नव्हता.’ असं देखील सीमा चांदेकर म्हणाल्या.

वयाच्या 57 व्या वर्षी लग्नाच्या निर्णयावर सीमा चांदेकर म्हणाल्या, ‘या वयात अन्य कोणत्या गरजांसाठी म्हणून कोणी लग्न करत नाही. या वयात लग्नाची काय गरज? असं देखील म्हटलं जातं. माझ्यासारखा अन्य महिलांनी देखील विचार करावा असं मला म्हणायचं नाही. प्रत्येकीचे विचार वेगळे असतात. अपघात झाल्यानंतर मला एकटं वाटू लागलं.’

‘अपघातानंतर मला त्रास झाला तर मला मुलांसांगता येत नव्हतं. सिद्धार्थला मी सगळं काही फोनवर सांगू शकत नव्हते. कोणतीही गोष्टी असेल म्हणजे आज आम्ही मैत्रिणी भेटलो, मज्जा आली… या सगळ्या गोष्टी मी मुलांना फोनवर सांगू शकत नव्हती. मुलं ऐकतात पण त्यांच्याकडे एवढा वेळ असायला हवा… या सर्व गोष्टी मला जाणवू लागल्या होत्या…’ असं देखील सीमा चांदेकर म्हणाल्या.