राष्ट्रवादी पक्षाची मालकी अजित पवारांकडे गेल्यावर तेजस्विनी पंडितचं ट्विट तुफान व्हायरल, म्हणाली…
Tejaswini Pandit Twit Viral : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं ट्विट व्हायरल झालं आहे.
मुंंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्याने त्यांच्यासाठी आनंदी-आनंद आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षाचा निकाल बहुमताच्या आधारावर दिला गेलाय. या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
तेजस्विनी पंडित ट्विटमध्ये काय म्हणाली?
जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे, असं तेजस्विनी पंडितने ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये तेजस्विनी पंडितने कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे तिने केलेल्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे आहे? हे स्पष्ट नाही झालं. नेटकऱ्यांनी तेजस्विनीच्या ट्विटचा रोख हा अजित पवारांवर असल्याचा त्यांच्या कमेंटमधून दिसून आलं आहे.
जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !
— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
तेजस्विनी पंडित सामजिक विषयांवर आपली मते मांडताना दिसते. काहीवेळा नेटकरी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात. याआधी संसदेत जेव्हा विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं, त्यावेळी सुद्धा तेजस्विनीने केलेलं ट्विट व्हायरल झालं होतं. चला बिलं पास करून घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासूनच होती आता तर विरोध करायला कोणी नाही. लोकशाहीचा बसली धाब्यावर… हुकूमशाही उदय की अंताकडे प्रवास, असं ट्विट तेजस्विनी पंडितने केलं होतं.
दरम्यान, तेजस्विनी पंडितच्या या ट्विटवरून तिने केंद्र सरकारवर निशाणा साधला होता हे स्पष्ट होतं. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिल्यानंतर तिने केलेल्या ट्विट रोख हा समजून येत आहे.