Mayuri Deshmukh | पतीच्या निधनानंतर 3 महिन्यांनी मयुरी देशमुख चित्रीकरणावर परतली, स्टार प्लसच्या नव्या मालिकेत झळकणार!

पतीच्या मृत्यूचे दुःख सावरत मयुरी पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाल्याने, तिच्या चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

Mayuri Deshmukh | पतीच्या निधनानंतर 3 महिन्यांनी मयुरी देशमुख चित्रीकरणावर परतली, स्टार प्लसच्या नव्या मालिकेत झळकणार!
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 5:29 PM

मुंबई : ‘कुल्फी कुमार बाजेवाले’ आणि ‘ये जादू है जिन का’ सारख्या ब्लॉकबस्टर मालिकांनंतर गुल खान ‘फोर लायन्स’ प्रोडक्शन अंतर्गत स्टार प्लसवर आता एक नवीन रोमँटिक मालिका घेऊन येते आहे. या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण दाखवणारी कथा सादर केली जाणार आहे. एक नायक आणि दोन नायिकांच्या भोवती मालिकेची कथा फिरणार आहे. याच मालिकेतून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख (Marathi Actress Mayuri Deshmukh) छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. (Marathi Actress Mayuri Deshmukh To be Seen In star plus new show)

या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे. मयुरी यापूर्वी अनेक मराठी मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये दिसली होती. या मालिकेतून ती हिंदी मालिकाविश्वामध्ये पदार्पण करत आहे.

मयुरीसह या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुम्बुल तौकीर याआधी ‘इशारो इशारो में’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत झळकली होती. तर, अभिनेता गश्मीर महाजनी नेटफ्लिक्सच्या एका वेब सीरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसला होता. (Marathi Actress Mayuri Deshmukh To be Seen In star plus new show)

दुःख सावरत मयुरीचे पुरागमन

“खुलता खळी खुलेना” फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने 3 महिन्यांनपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. त्यानंतर, आता पतीच्या मृत्यूचे दुःख सावरत मयुरी पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाल्याने, तिच्या चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

आई घरात असतानाच अभिनेत्याने घेतला गळफास

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

आशुतोष नैराश्यात होता

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आशुतोषने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती, माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली होती.

(Marathi Actress Mayuri Deshmukh To be Seen In star plus new show)

संबंधित बातम्या : 

Aashutosh Bhakre suicide | नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

Mayuri Deshmukh | “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

View this post on Instagram

A post shared by Mayuri 🙂 (@mayurideshmukhofficialll) on

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.