घाबरु नका, बोला, मंदार देवस्थळींनी पैसे थकवले, मराठी अभिनेत्रीचा गंभीर आरोप

शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत असून या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे पैसे मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. | Sharmishtha Raut

घाबरु नका, बोला, मंदार देवस्थळींनी पैसे थकवले, मराठी अभिनेत्रीचा गंभीर आरोप
शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेतील मृणाल दुसानीस, संग्राम साळवी आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 11:00 AM

मुंबई: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही कलाकार आणि तंत्रज्ञांना योग्य मोबदला मिळत नसल्याचे शर्मिष्ठा राऊत हिने म्हटले आहे. (Marathi actress Sharmishtha Raut allegations on Mandar Devasthali)

शर्मिष्ठा राऊत हिने इन्स्टाग्राम पोस्ट करुन हे प्रकरण सर्वांसमोर आणले आहे. शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत असून या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे पैसे मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेतील मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे.

गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”, असे आवाहन शर्मिष्ठाने पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

‘आमचेचे पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागत आहेत’

मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का, असा प्रश्नही शर्मिष्ठाने उपस्थित केला आहे.

आम्ही कलाकार कोणतंही चॅनल किंवा निर्माता असो नेहमीच आमच्याकडून चांगलं काम व्हावं, या हेतूने मेहनत घेतो. उत्तम काम केल्यावर योग्य मोबदला हाच हेतू असतो. पण काम करुनही वेळेवर मोबदला न मिळणे, योग्य आहे का? चॅनलाच उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा मोबदला देत नाही. अनेक कारणं वारंवार मिळत असतात, असे शर्मिष्ठा राऊतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत मंदार देवस्थळी?

मंदार देवस्थळी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील बड्या आणि प्रथितयश नावांपैकी एक आहे. मंदार देवस्थळी यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. यापैकी अनेक मालिका लोकप्रियही ठरल्या होत्या. यामध्ये ‘बोक्या सातबंडे’, ‘आपली माणसं’,’झुंज’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘वसुधा’,’खरंच माझं चुकलं का???’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’जिवलगा’, ‘मायलेक’, ‘कालाय तस्मैनम:’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, अशा मालिकांचा समावेश आहे.

(Marathi actress Sharmishtha Raut allegations on Mandar Devasthali)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.