‘धस’ होतंय काळजात’; प्राजक्तासाठी मराठी कलाकार एकवटले; कलाकारांची खोचक पोस्ट

प्राजक्ता माळीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे. दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर प्राजक्ताला पाठिंबा देत पोस्ट केल्या आहेत. तसेच #isupportprajaktamali हा ट्रेंडही सोशल मीडियावर सुरू केला आहे.

'धस' होतंय काळजात'; प्राजक्तासाठी मराठी कलाकार एकवटले; कलाकारांची खोचक पोस्ट
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 6:21 PM

भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता हता त्यावरून नंतर प्रकरण प्रचंड वाढत गेले होते. धसांनी प्राजक्तावर केलेल्या आरोपांमुळे संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपला राग व्यक्त केला. गेल्या दीड महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू होता, मात्र आता लोकप्रतिनिधींनी माझ्या नावाचा उल्लेख केल्यानं पत्रकार परिषद घेत असल्याचं प्राजक्तानं सांगितलं होतं.

तसेच प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर तिला पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठी कलाकार पुढे आले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा देत तिच्याबद्दल सुरु असलेल्या या प्रकाराबद्दल नाराजी, राग व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशाखा सुभेदार, हेमांगी कवी, गौतमी पाटील, कुशल बद्रिके, सचिन गोसावी यांच्यासह नितीन वैद्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.

सचिन गोस्वामी

“ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळी बाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे..आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.” अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी केली आहे

कुशल बद्रिके

“कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा 3 ते 4 वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र “धस“ होतय काळजात, कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला intrest यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध. प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे.” अशी पोस्ट शेअर करत कुशल बद्रिकेने संताप व्यक्त करत प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला आहे.

विशाखा सुभेदार

प्राजक्ता माळी… मी तुझ्यासोबत आहे..! आपल्या जीवावर भाषण करावी.. दुसऱ्याचं नाव विनाकारण गुंफणं, हे अजिबातच माणुसकीला धरून नाही. असं वक्तव्य विशाखा सुभेदारनं केलं असून तिनेही प्राजक्ताला एक मैत्रिण आणि एक कलाकार म्हणून पाठिंबा दर्शवला आहे.

#isupportprajaktamali हा ट्रेंड सुरु 

अशापद्धतीने अनेक कलाकारांनी आपल्या भावना पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर कलाकारांनी #isupportprajaktamali हा ट्रेंडही सुरु केला आहे. अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले यांनी देखील पोस्ट करत #isupportprajaktamali लिहिलं आहे सोबतच त्यांनी निर्माते नितीन वैद्य यांची पोस्टही शेअर केली आहे.

कलाकारांसोबत अनेक नेटकऱ्यांनी देखील आपली मतं मांडत एका चांगल्या अभिनेत्रीला उगीच बदनाम केलं जात असल्याचं म्हटलं आहे.. प्राजक्ताला आता मराठी कलाकारांसोबतच सामान्य जनतेचाही चांगला पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येतंय.

'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.