आधी हातावर नावं गोंदवली, आता मात्र एकमेकांसोबत दिसणंही कठीण! शिव-वीणाच्या नात्यात ‘का रे दुरावा’?

‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी एकमेकांची नावं हातावर गोंदवून घेतली होती. इतकेच नाही तर, या घरातून बाहेर पडल्यावरही सोशल मीडिया पेजवर शिव कधी एकटा दिसला नाही आणि वीणाही कधी एकटी दिसली नाही.

आधी हातावर नावं गोंदवली, आता मात्र एकमेकांसोबत दिसणंही कठीण! शिव-वीणाच्या नात्यात ‘का रे दुरावा’?
शिव ठाकरे आणि वीणा जगताप
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 12:41 PM

मुंबई : मनोरंजन विश्वात जोड्या जुळायला अनेकदा वेळ लागतो, पण या जोड्या तुटायला एक कारणही पुरेसं ठरतं. गेल्या काही काळात मराठी मनोरंजन सृष्टीत एकमेकांसोबत नेहमी दिसणाऱ्या जोड्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. यामध्ये ‘मराठी बिग बॉस’चे (Bigg Boss Marathi) लव्ह बर्ड्स अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) यांची जोडी अग्रक्रमी होती. ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये ते स्पर्धक म्हणून आले आणि हा कार्यक्रम संपला तेव्हा, ते एकमेकांचे जोडीदार बनून या घरातून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांच्या या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे (Marathi Bigg Boss fame Shiv Thakare And Veena Jagtap breakup rumors viral on social media).

‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी एकमेकांची नावं हातावर गोंदवून घेतली होती. इतकेच नाही तर, या घरातून बाहेर पडल्यावरही सोशल मीडिया पेजवर शिव कधी एकटा दिसला नाही आणि वीणाही कधी एकटी दिसली नाही. ही जोडी नेहमीच एकत्र दिसत होती. मात्र, आता ही जोडी एकत्र दिसणं अगदीच दुर्मिळ झालं आहे.

‘या’मुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण!

तसे एरव्ही एकत्र दिसणारे शिव-वीणा शिवच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र गैरहजर होती. नुकताच शिवने ‘बी रिअल’ हा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आणि या लॉन्चिंग पार्टीमध्ये त्याची अत्यंत जवळची मैत्रीण आणि लवकरच त्याच्या आयुष्याची होणारी साथीदार वीणा मात्र कुठेच दिसली नाही. या सोहळ्याला वीणाचं नसणं, हे या चर्चेला निमित्त ठरलं आहे.

शिवचे उद्योग विश्वात पदार्पण :

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 (Marathi Bigg Boss fame Shiv Thakare And Veena Jagtap breakup rumors viral on social media).

वीणा आणि शिव ही जोडी बिग बॉस घरापुरती एकत्र दिसेल आणि त्यानंतर या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या होतील, असे अनेक अंदाज त्यावेळी व्यक्त केले जात होते. पण, या सगळ्या अंदाजांना खोटं ठरवत वीणा आणि शिवनं त्यांचं नातं टिकवून ठेवलं होतं. यात आता माशी कुठे शिंकली?, असा प्रश्न दोघांचेही चाहते विचारात आहेत. त्यांच्या वाद झाला का? या प्रश्नावरून चाहते आता थेट त्यांचा ब्रेकअप झाला का?, असा प्रश्न विचारू लागले आहेत. वीणाने शिवला सोशल मीडियावर चक्क अनफॉलो केलं आहे, यामुळे आता ही चर्चा आणखीनच वाढू लागली आहे (Marathi Bigg Boss fame Shiv Thakare And Veena Jagtap breakup rumors viral on social media).

ब्रेकअपच्या चर्चांवर काय म्हणाला शिव ठाकरे?

नेहमी दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर काहीच गोष्टी शेअर केल्या नाहीत. त्यामुळे चाहत्यांनी नात्याबद्दल विचारल्यानंतर शिव ठाकरेने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. याबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला, ‘आम्ही  दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळ आली की, नक्कीच लग्नाचा विचार करू.’ आमचा ब्रेकअप झालेला नाही, लग्नबांधनात अडकायला आवडेल, असेही तो पुढे म्हणाला.

(Marathi Bigg Boss fame Shiv Thakare And Veena Jagtap breakup rumors viral on social media)

हेही वाचा :

Oscar 2021 | प्रियंका चोप्रा-राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ला ऑस्कर नॉमिनेशन!

Govinda | ‘मीसुद्धा घराणेशाहीचा बळी ठरलो होतो’, रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या गोविंदाच्या संतापाचा उद्रेक!

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...