‘दिल्ली का छोरा’ झाला मराठी सिनेमाचा हिरो; म्हणाला, तसा मी मराठीच…

Ankit Mohan on Babu Movie : बाबू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता अंकित मोहन झळकणार आहे. या सिनेमाबाबत अंकित मोहन बोलता झाला. त्याने त्याच्या मराठी भाषेवरील प्रेमावर भाष्य केलं. अंकित मोहन काय म्हणाला? वाचा सविस्तर...

'दिल्ली का छोरा' झाला मराठी सिनेमाचा हिरो; म्हणाला, तसा मी मराठीच...
बाबू सिनेमाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 11:22 PM

हिंदी टेलिव्हिजनवर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिल्लीच्या अंकित मोहनने मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडली. अंकितने ऐतिहासिक चित्रपटातच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले. आणि बघताबघता त्याने मराठीतही स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला. त्यांनतर त्याने आणखी काही ऐतिहासिक चित्रपटही केले. आता अंकित आगरी-कोळी भाषेत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ‘बाबू’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिल्लीचा अंकित चक्क आगरी कोळी भाषेत बोलताना दिसणार आहे.

“मी तर मराठीच, कारण…”

मी आता मराठीच आहे. खरंतर माझे नाव आता अंकित मोहनकर किंवा अंकित मोहन पाटील करायला पाहिजे. इतका मी मराठी सिनेसृष्टीत रुळलो आहे. ही भाषा आता मला माझीच भाषा वाटते. ऐतिहासिक चित्रपटांसाठी मी मराठी भाषा शिकायला सुरुवात केली. तर आता ‘बाबू’च्या निमित्ताने मी आगरी-कोळी भाषा शिकलो. कोळी भाषा खूप गोड आहे, असं अंकित म्हणाला.

अंकित काय म्हणाला?

माझी मराठी भाषेचा सराव करण्याची एक पद्धत आहे. मी गाडीत, घरात, जिममध्ये ऑडीओवर सतत डायलॉग्स ऐकत राहतो. त्यामुळे मला ते कसे उच्चरायचे हे कळते. सेटवरही मी सहकलाकारासोबत मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. जेणे करून माझे उच्चार नीट होतील आणि मुळात ‘बाबू’मधील व्यक्तिरेखा साकारताना मला त्यात अंकित दिसला. कारण जे जे अंकितने दिल्लीत केले ते सगळे बाबूच्या आयुष्यातही घडत आहे. त्यामुळे ‘बाबू’ खूप जवळचा आहे, असं अंकितने सांगितलं.

बाबू सिनेमात कोण- कोण कलाकार दिसणार?

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या 2 ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका.
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन.