‘लागीर झालं जी’ मालिकेपर्यंत आई धुण्याभांड्याची कामं करायची; किरण गायकवाडने सांगितली ती आठवण
Kiran Gaikwad on His Mother and Lagir Zal ji : 'लागीर झालं जी' ही झी मराठीवरची मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील पात्रांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच मालिकेतील भैय्यासाहेब देशमुख हे पात्र साकारणारा अभिनेता किरण गायकवाड काय म्हणाला? वाचा...
झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटत होती. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील युवराज देशमुख अर्थात भैय्यासाहेब देशमुख हे पात्रही प्रेक्षकांना आडायचं. अभिनेता किरण गायकवाड याने हे भैय्यासाहेब देशमुख पात्र साकारलं होतं. याच मालिकेच्या वेळच्या आठवणी किरणने शेअर केल्यात एका मुलाखतीदरम्यान किरण गायकवाडने या मालिकेवेळीची आठवण सांगितली आहे. तसंच ‘देवमाणूस’ मालिकेवेळी आई प्रचंड रडली होती, असंही किरण म्हणाला.
आई तेव्हा खूप रडली होती- किरण
माझी आई धुण्याभांड्याची कामं करायची अगदी ‘लागीर झालं जी’ मालिकेपर्यंत ती ते काम करत होती. पण मग मी तिला सांगितलं की आता नको करूस. मग आईने ते काम बंद केलं, असं किरण गायकवाड म्हणाला. ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू होती. या मालिकेत व्हिलनचं कॅरेक्टर मी करत होतो. या पात्रावर लोकांनी प्रेमही केलं. तर काहींना ते पात्र नाही आवडायचं. तेव्हा लोक येऊन आईला सांगायचे की कसा आहे तो लोकांना किती त्रास देतो वगैरे… त्यावेळी आई खूप रडली होती. त्याचं मलाही खूप वाईट वाटलं. आजही त्या गोष्टीचं वाईट वाटतं, असं किरण गायकवाड म्हणाला.
View this post on Instagram
“आईला सेटवर नेत नाही कारण…”
आईला मी कधीच कुठल्या सेटवर नेत नाही. मी ठरवलं आहे की जेव्हा मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर करेन तेव्हा आईला मी सेटवर नेईन. निगेटिव्ह काम करत असताना मला तिला नाय न्यायचं सेटवर… डंका सिनेमाचं शुटिंग रात्री झालं. त्यामुळे तिला नेलं नव्हतं. पण मला आईचा खूप जास्त सपोर्ट आहे, असं किरणने सांगितलं.
मला फोनवर बोलायला फारसं आवडत नाही. हे आईला माहिती आहे. त्यामुळे ती मला फक्त कधी येणार आहेस? जेवणार आहेस का? एवढंच विचारायला फोन करते. बाकी आम्ही घरी असताना एकमेकांशी बोलतो, असं किरण गायकवाडने सांगितलं.