याशिवाय दिवसाची होऊच शकत सुरुवात नाही; रिंकू राजगुरूचं ‘परफेक्ट मॉर्निंग रूटिन’
Actress Rinku Rajguru Morning Routine : कलाकार त्यांच्या रूटिनबाबत फार अलर्ट असतात. अभिनेत्री रिंकू राजगुरु देखील तिचं 'मॉर्निंग रूटिन' पाळते. एका मुलाखतीत तिने याचबाबत भाष्य केलं आहे. रिंकूचं मॉर्निंग रूटिन कसं आहे हे जाणून घ्या, वाचा सविस्तर बातमी...
दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर दिवस चांगला जातो… त्याचमुळे दिवसाची परफेक्ट सुरुवात होणं खूप जास्त गरजेचं आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्या आवडीचं काम केलं की मूड फ्रेश होतो. कलाकारही त्यांचं मॉर्निंग रूटिन आवर्जून पाळतात. अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या मॉर्निंग रूटिनवर भाष्य केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान रिंकूने तिच्या ‘परफेक्ट मॉर्निंग रूटिन’ सांगितलं आहे. सकाळी 6.30- 7 वाजता उठते. रात्री 10. 30- 11 पर्यंत मी झोपी जाते. त्यामुळे सकाळी लवकर जाग येते. सकाळी लवकरच उठलं की दिवसही फ्रेश जातो, असं रिंकूने सांगितलं.
अशी होते रिंकूच्या दिवसाची सुरुवात
सकाळी उठले की सगळ्यात आधी मी घर झाडून घेते. मग मी मस्त चहा पिते. त्यानंतर वर्कआऊट करते आणि त्यानंतर मग मी पुस्तक वाचते. किंवा एखादा सिनेमा पाहते. एखादी मिटिंग असेल तर त्यासाठी जाते. स्वत: जेवण बनवून मी खाते. असा माझा दिवस जातो, असं रिंकू राजगुरु म्हणाली.
चहाशिवाय दिवसाची सुरुवात नाही- रिंकू
मला चहा प्यायला खूप आवडतो. माझी चहा बनवण्याची पद्धतही माझी वेगळी आहे. वेलची पूड, तुळस आलं टाकून मी चहा बनवते. चहामध्ये मला साखर आवडत नाही. मला गुळाचा चहा आवडतो. उठल्यानंतर मला चहा लागतो. चहा घेतला की मग माझ्या दिवसाची परफेक्ट सुरुवात होते. आधी मी चहा प्यायचे नाही. पण मग आईमुळेच मला चहाची सवय लागली. सकाळी उठलं की आई सगळ्यात आधी चहा बनवायची. तेव्हापासून मला चहाची सवय लागली आहे. चहा, आई आणि मी हे समीकरण ठरलेलं आहे. सकाळ- दुपार- संध्याकाळ… कधीही आम्ही चहा पितो. कधी-कधी तर रात्री जेवणानंतरही आम्ही दोघी मस्त चहा बनवून पितो. इतका चहा पिणं योग्य नाही पण मी पिते चहा…, असं रिंकूने सांगितलं.
View this post on Instagram
सकाळी उठले की गरम पाणी आणि लिंबू पिते. त्यानंतर मी घर झाडून घेते. मग बाकीच्या कामांना लागते. घर स्वच्छ झालं की छान वाटतं. घरातली सगळी माझी- माझी कामं करायला मला आवडतं. त्याची एक शिस्त आहे. ती मला आवडतं. तुळशीला पाणी घालायला. त्याच्यासमोर रोज अगरबत्ती लावायला मला आवडतं. ते मी रोज करते. त्यामुळे घरात फ्रेशनेस येतो. छान वाईब तयार होते. दिवस प्रसन्न जातो, असं रिंकू राजगुरूने मुलाखतीत सांगितलं.