‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!

संस्कृतीने वधूच्या वेशात केलेल्या फोटोशूटमुळे चाहत्यांच्या मनात 'सनई-चौघडे' वाजू लागले. (Sanskruti Balgude Atul Kulkarni)

'अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!
संस्कृती बालगुडे आणि मॉडेल अतुल कुलकर्णी
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:42 PM

मुंबई : आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हिचे नवे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. संस्कृतीने नुकतेच रॉयल वेडिंग थीमवर फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्यासोबत युवा मॉडेल अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) झळकला आहे. अतुल म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) (ज्युनिअर) हिचा भाऊ. (Actress Sanskruti Balgude shares Photoshoot with Actress Sonalee Kulkarni brother Atul Kulkarni)

संस्कृती विवाहबंधनात अडकण्याच्या चर्चा

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटोशूट शेअर केलं आहे. संस्कृतीने वधूच्या वेशात केलेल्या फोटोशूटमुळे चाहत्यांच्या मनात ‘सनई-चौघडे’ वाजू लागले. संस्कृती विवाहबंधनात अडकणार आहे का, असा प्रश्न अनेक चाहत्यांनी कमेंटमधून विचारला.

संस्कृतीचं सौंदर्य खुलवणारे दागिने

खरं तर संस्कृतीने रॉयल वेडिंग कलेक्शनसाठी हे फोटोशूट केलं आहे. फोटोशूटसाठी संस्कृतीने नववधूचा वेश परिधान केला आहे. हिरे आणि मोत्यांनी जडलेले अलंकार संस्कृतीचं सौंदर्य अधिकच खुलवत आहेत. फॉलोअर्सनी संस्कृतीच्या लूक्सचं कौतुक तर केलं आहेच, मात्र तिच्यासोबत असलेल्या मॉडेलबाबतही चर्चा रंगली. हे फक्त शूट आहे, माझा साखरपुडा झालेला नाही, लग्न तर अजिबात करत नाहीये, असं स्पष्टीकरण संस्कृतीने आधीच कॅप्शनमधून दिलं आहे.

‘अप्सरा’चा भाऊ अतुल कुलकर्णी

संस्कृती बालगुडेसोबत मॉडेलिंग करणारा तरुण आहे अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) म्हणजेच ‘अप्सरा’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा धाकटा भाऊ. बहिणीच्या पाठोपाठ अतुलनेही मनोरंजन विश्वात नशीब आजमावलं. अतुलने याआधीही मॉडेलिंग केलं आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर फोटो शेअर केले आहेत. ताज्या फोटोशूटमध्ये लांब दाढीतील अतुलचा लूक लक्षवेधी ठरत आहे. यापूर्वी संस्कृती-अतुलची जोडी ‘धरला माझा हात’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

संस्कृती बालगुडेने छोटा-मोठा पडदा गाजवला

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले. अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.

(Actress Sanskruti Balgude shares Photoshoot with Actress Sonalee Kulkarni brother Atul Kulkarni)

इतर फोटो गॅलरी :

संस्कृती बालगुडेची किलर अदा, पाहा फोटो

‘शी मेड माय वॉल हॅप्पी’, संस्कृती बालगुडेनं घराच्या भिंतीवर रेखाटलं ‘मधुबाला’चं चित्र!

(Actress Sanskruti Balgude shares Photoshoot with Actress Sonalee Kulkarni brother Atul Kulkarni)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.