‘नेता गीता’ चित्रपटाचं पहिलं गाणं लाँच; शिवानी बावकर-सुधांशु बुडूखचा रोमॅन्टिक अंदाज

Shivani Baokar New Movie Neta Geeta Song Release : अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'नेता गीता' या सिनेमातील मन प्रेमात रंगले... नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शिवानी बावकर- सुधांशु बुडूख यांचा रोमॅन्टिक अंदाज या गाण्यात पाहायला मिळतोय.

'नेता गीता' चित्रपटाचं पहिलं गाणं लाँच; शिवानी बावकर-सुधांशु बुडूखचा रोमॅन्टिक अंदाज
शिवानी बावकरचं नवं गाणं रिलीजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 7:51 PM

कॉलेज जीवनातील राजकारण, प्रेम यांची गोष्ट गुंफून साकारलेल्या ‘नेता गीता’ या चित्रपटातून प्रेक्षकांना म्युझिकल ट्रीट मिळणार आहे. या चित्रपटातलं ‘मन प्रेमात रंगले…’ हे पहिल गाणं लाँच करण्यात आलं आहे. हिंदी चित्रपटाच्या तोडीचं असलेलं हे गाणं गायक अभय जोधपूरकरनं गायलं आहे. ‘मन प्रेमात रंगले…’ गाण्यात शिवानी बावकर आणि सुधांशु बुडूख यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळत आहे. म्युझिकल ट्रीट देणारा ‘नेता गीता’ हा चित्रपट 23 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लाडकी शितली अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

सिनेमाची गोष्ट काय?

कॉलेज जीवन म्हटल्यावर प्रेम स्वाभाविकपणे येतं. मात्र ‘नेता गीता’ या चित्रपटात कॉलेज काळातल्या निवडणुका, त्या वेळचं प्रेम यांची कहाणी मांडण्यात आली आहे. रंजक कथानकाला श्रवणीय संगीताचीही जोड मिळाली आहे. अतिशय युथफुल असलेल्या या चित्रपटातील चार गाणी तरुणांसाठी नक्कीच मेजवानी ठरणार आहेत. प्रेम, मैत्री आणि कॉलेज जीवन यावर आधारित ‘नेता गीता’ हा सिनेमा आहे. कॉलेज जीवनातील प्रेमावर हा सिनेमा भाष्य करतो.

उत्तम संगीत असलेली चार गाणी अभय जोधपूरकर, निरंजन पेडगावकर यांनी गायली आहे. ‘मन प्रेमात पडले..’ या गाण्याचे शब्द, संगीत तरुणाईला आवडतील असेच आहेत. त्याशिवाय या गाण्याचं छायांकनही अतिशय नेत्रसुखद आहे. त्यामुळे ‘नेता गीता’ चित्रपटातील गीतांचा हा अल्बम तरुणाईला भूरळ पाडतो आहे.

सिनेमात कोण-कोण कलाकार?

सिम्बारिया फिल्म्सतर्फे ‘नेता गीता’ या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात येत आहे. सुधांशु बुडूख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात शिवानी बावकर, सुधांशु बुडूख, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, अजय तपकिरे, विराज अवचिते, सुहास जोशी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीव हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.