मराठी कलाविश्वात विविध विषय हाताळले जात आहेत. सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेंड सुरु असताना प्रेक्षकही नव्या धाटणीच्या सिनेमांना चांगलीच पसंती देत आहे. तुम्हाला कॉमेडी थ्रिलर सिनेमाचा तडका पाहायचा असेल तर 4 मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एका प्रेमी युगलाच्या लिव्ह इन रिलेशनशिपला मर्डर मिस्ट्रीमुळे लागलेले ग्रहण असं कथानक आगामी ‘झटका’ या चित्रपटात पहायला मिळेल. उत्तेजना स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘झटका’ (Jhatka) या चित्रपटात झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ फेम पूर्णिमा डे (Purniemaa Dey) आणि नवोदित अभिनेता गौरव उपासानी (Gaurav Upasani) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरने कथेविषयीची उत्सुकता वाढवली आहे. ‘जाने भी दो यारो’, ‘अंधाधुंद’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमधून ब्लॅक कॉमेडी प्रेक्षकांनी अनुभवली. मराठी चित्रपटांमध्ये तो फारसा पहायला मिळाला नव्हता. हसवत हसवता स्तब्ध करणारा, घाबरवणारा, शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारा असा हा ‘झटका’ चित्रपट आहे.
पहिल्यावहिल्या रोमान्सची स्वप्न रंगवत नवा फ्लॅट भाड्याने घेत ही जोडी आपल्या प्रेमाला बहर देणार, तेवढ्यातच एका बंद कपाटात त्यांना एक मृतदेह सापडतो आणि सुरु होतो पोलिसांचा ससेमिरा. यातून दोघं कशी सुटतात, खूनाची चौकशी अंगावर आल्यावर एकमेकांवर ढकलपंची करताना दोघांमध्ये होणारा विनोद, ‘तो’ मृतदेह कोणाचा असतो, मृतदेहाचा आणि नायक-नायिकेचा काय संबंध असतो, या सर्व गोष्टींचा उलगडा होत असताना अनेक विनोदी दृश्येही प्रेक्षकांना हसवणारी आहेत.
या चित्रपटाची निर्मिती डॉ पार्थसारथी, प्रेरणा उपासानी यांनी केली आहे. दिग्दर्शक अजिंक्य उपासानी हे ‘झटका आता सुरुवात गोंधळाची’ चित्रपटाचे सिनेमेटोग्राफरही आहेत. यासह गौरव आणि अजिंक्य उपासानी या बंधूंनी या चित्रपटाचा स्क्रिनप्लेही लिहिला आहे.
हेही वाचा:
स्वतंत्र राहण्याच्या धडपडीत अरुंधती पडणार एकटी? बाईचं एकटं राहणं अजूनही पचनी का पडत नाही?
अंकिता लोखंडेनं पुन्हा केलं लग्न; आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी उचललं पाऊल
‘पावनखिंड’ OTTवर का प्रदर्शित केला नाही; चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं