Bhirkit Movie : गिरीश कुलकर्णी यांचा ‘भिरकीट’ 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, गुढीपाडव्यानिमित्त पोस्टर आऊट

Bhirkit Marathi Movie : 'भिरकीट' या चित्रपटाच्या पोस्टरवरून या चित्रपटाचीविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अखेर १७ जून रोजी 'भिरकीट' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Bhirkit Movie : गिरीश कुलकर्णी यांचा 'भिरकीट' 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, गुढीपाडव्यानिमित्त पोस्टर आऊट
'भिरकीट' 17 जूनला भेटीला येणार Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 2:39 PM

मुंबई : सध्या अनुप जगदाळे (Anup Jagdale) दिग्दर्शित ‘भिरकीट’ (Bhirkit Movie) या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती. आज गुढीपाडव्याच्या निमित्त सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला आहे. यात गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) दिसत आहेत. गिरीश कुलकर्णींसोबत ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे एकाच स्कुटरवर दिसले. या धमाल पोस्टरवरून या चित्रपटाचीविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अखेर 17 जून रोजी ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या संदर्भात दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच ‘भिरकीट’ आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातूनच उडू लागतात विनोदाची कारंजी. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे, कलाकारही तितकेच ताकदीचे आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे.”

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत ,कॅमेरा मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहेत. शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे धमाल संगीत लाभले आहे ,युफओने या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. रसिकप्रेक्षक या विनोदी सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. गिरीश कुलकर्णीं, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे हे कलाकार या सिनेमात एकत्र पाहाला मिळणार आहेत. पोस्टरवरून या चित्रपटाचीविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अखेर 17 जून रोजी ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sagar Karande : कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी सागर कारंडेचा लोकल प्रवास

My Dad’s Wedding : सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट…

will smith: ‘थप्पड की गुंज’चे परिणाम! अखेर अभिनेता विल स्मिथचा ॲकडमीचा राजीनामा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.