‘आरसा-द स्टेट्स’ लघुपटचा सन्मान, आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पुरस्कार

पी.एम.शाह फाउंडेशनच्यावतीने आयोजित १० व्या आरोग्य चित्रपट महोत्सव प्रसंगी सुखटणकर यांच्या हस्ते महोत्सवातील विजेत्या चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड.चेतन गांधी उपास्थित होते. यात 'आरसा-द स्टेट्स' ला प्रथम पुरस्कार मिळाला.

'आरसा-द स्टेट्स' लघुपटचा सन्मान, आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पुरस्कार
आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये 'आरसा-द स्टेट्स' ला प्रथम पुरस्कारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 8:10 AM

मुंबई : पी.एम.शाह फाउंडेशनच्यावतीने आयोजित 10 व्या आरोग्य चित्रपट महोत्सव प्रसंगी सुखटणकर यांच्या हस्ते महोत्सवातील विजेत्या चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड.चेतन गांधी उपास्थित होते. महोत्सवात माहितीपट या विभागात दिनेश वसंतराव आखाडे दिग्दर्शित ‘रिबर्थ’(Rebirth) माहितीपटाला प्रथम पुरस्कार, ‘फॉर हर’ या डॉ. शेखर कुमार कुलकर्णी दिग्दर्शित माहितीपटाला द्वितीय पुरस्कार तर प्रदीप कुमार अग्निहोत्री दिग्दर्शित ‘ऑटिझम – मुव्हिंग अहेड’ या माहितीपटाला तृतीय पुरस्कार मिळाला. तर लघुपट विभागात गणेश मोडक दिग्दर्शित व आशिष निनगुरकर लिखित ‘आरसा – द स्टेटस(Aarasa The States) या लघुपटास प्रथम पुरस्कार, सुमीत पाटील दिग्दर्शित ‘लाल’ लघुपटास द्वितीय पुरस्कार मिळाला तर सोनल राठोड दिग्दर्शित ‘ब्रा’ लघुपटाने तृतीय पुरस्कार मिळाला.

अनेकदा लघुपट, माहितीपट कलाकारांना मुख्य प्रवाहातील कलाकारांप्रमाणे वागणूक मिळत नाही. त्यांना दुय्यम वागणूक मिळते. पण चित्रपट या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतलेल्या तरूणाईने स्वतःला दुय्यम न समजता आपले काम करत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.प्रथम पुरस्कार प्राप्त ‘आरसा- द स्टेट्स’ या लघुपटाचा पुरस्कार लेखक आशिष निनगुरकर,अभिनेत्री श्वेता पगार आणि अभिनेते प्रदीप कडू यांनी स्वीकारला “आरसा” लघुपटाची निर्मिती काव्या ड्रीम मुव्हीज व सौ.किरण निनगुरकर यांनी केली असून छायांकन योगेश अंधारे यांचे आहे.तर अशोक कुंदप व आशा कुंदप यांनी सहाय्यक निर्मिती केली आहे.या लघुपटात श्वेता पगार यांच्यासह संकेत कश्यप,चैत्रा भुजबळ,गीतांजली कांबळी,डॉ.स्मिता कासार व वैष्णवी वेळापुरे यांनी भूमिका केल्या आहेत.

“पुर्वी चार मिनिटांचा चित्रपट बनविण्यासाठी तेरा हजार रुपये खर्च करून रीळ आणावी लागायची. चित्रपट निर्मितीची प्रक्रिया अतिशय खर्चिक होती. तसेच तो बनविताना काही बंधने असायची. मात्र अलीकडील काळात डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती माध्यमाचे लोकशाहीकरण झाले असून, ही अतिशय आनंदाची बाब आहे,”असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुनील सुखटणकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सुखटणकर म्हणाले, ” डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती ही केवळ काही श्रीमंत लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर गावागावात ते पोहचले आहे. मात्र लघुपट किंवा माहितीपट हे व्यावसायिक चित्रपट निर्मितीसाठी ‘पहिले पाऊल’ नाही, तर तो एक स्वतंत्र विषय आहे. हे ही तरुण निर्मात्यांनी लक्षात घेतले पाहिजे”

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.