Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलाकारांची मांदियाळी असणारा ‘अन्य’ प्रदर्शनासाठी सज्ज, ट्रेलर लॉन्च, चित्रपट 10 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

10 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या 'अन्य'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्यानं सध्या सोशल मीडियापासून डिजिटल माध्यमांमध्येही याच चित्रपटाची चर्चा आहे.

कलाकारांची मांदियाळी असणारा 'अन्य' प्रदर्शनासाठी सज्ज, ट्रेलर लॉन्च, चित्रपट 10 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 8:10 AM

मुंबई :  ‘अन्य’ हा आगामी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीसोबतच रसिकांचेही कुतूहल वाढवत आहे. आगामी बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या यादीतील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘अन्य’चा  (Anya Movie) धडाकेबाज ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या ‘अन्य’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्यानं सध्या सोशल मीडियापासून डिजिटल माध्यमांमध्येही याच चित्रपटाची चर्चा आहे.सिम्मी यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं असून संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं आहे. अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं ‘अन्य’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटानं स्वीडनमधील अॅलव्हिसबीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, लंडनमधील फॅलकॅान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (मे एडिशन २०२१) मध्ये बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी केलं आहे.

प्रत्येक माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा असतोच… तसाच प्रत्येक चांगल्या माणसातसुद्धा वाईट माणूस असतो… आणि प्रत्येक वाईट माणसात कुणी अन्य, कुणी दुसरा चांगला माणूससुद्धा असतो… असा विचार मांडणारा हा चित्रपट एका चांगल्या ‘अन्य’ची कथा सांगणारा असल्याचं प्रथमदर्शनी ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. हेरगिरी, सत्य परिस्थिती, सेक्स ट्रॅफिकींग, बालमजूरी, अनाथांची व्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आजघडीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा ‘अन्य’ देशात बदल घडवणारे विचार सादर करणारा असल्याचं ट्रेलरमध्ये पहायला मिळतं. सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट मानव तस्करीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेऊन समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा प्रयत्न ‘अन्य’ करण्यात आला आहे.

सिम्मी यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं असून संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं आहे. अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. यांच्या जोडीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही नावलौकीक मिळवलेली अभिनेत्री रायमा सेन, हिंदी सिनेसृष्टीतील यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव हे कलाकारही ‘अन्य’मध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हिंदी सिनेमासाठी डॅा. सागर आणि सजीव सारथी यांनी, तर मराठीसाठी प्रशांत जामदार यांनी गीतं लिहीली आहेत. संगीतकार विपीन पटवा यांच्यासह राम नाथ, रिषी एस. आणि कृष्णा राज यांनी या गीतांना संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत रोहित कुलकर्णी यांनी दिलं असून, सज्जन कालाथील यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. निलम शेटये यांनी कॅास्च्युम डिझाईन, साभा मयूरी यांनी कोरिओग्राफी आणि थनुज यानी संकलन केलं आहे. प्रोडक्शन डिझाईनर म्हणून शेखर उज्जयीनवाल यांनी, तर असोसिएट दिग्दर्शक म्हणून नंदू आचरेकर, रॅाबिन आणि राजू यांनी काम पाहिलं आहे.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.