छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर सिनेमा; ‘हा’ अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका

Dharmarakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj Movie : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर सिनेमा येत आहे. या सिनेमाचं टायटल साँग रिलिज झालं आहे. या गाण्यातील शब्द आणि दृष्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिनेमा कधी रिलीज होणार? वाचा सविस्तर....

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर सिनेमा; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’सिनेमातील गाणं रिलीजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 3:22 PM

अवघ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर सिनेमा येत आहे. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’असं या सिनेमाचं नाव आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता ठाकूर अनुप सिंग याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘राजं संभाजी’ हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं गायक नंदेश उमप यांनी गायलं आहे. मोहित कुलकर्णी यांचं संगीत आहे आणि गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत. संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोण- कोण कलाकार?

‘राजं संभाजी’ हे गाणं आपल्या राष्ट्रवीर आणि हिंदवी स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव या सिनेमात पाहायला मिळतो. या गाण्यात उत्तम कलाकारांची तगडी फौज आहे ज्यामध्ये ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील हे महत्वाच्या भूमिकेत आहेत.

सिनेमा कधी रिलीज होणार?

धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे. येत्या 22 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ सिनेमाचे दिग्दर्शक तुषार शेलार यांनी या सिनेमाबाबतचं मत व्यक्त केलं आहे. टायटल साँगबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजं संभाजी’ हे गाणं चित्रपटाच्या हृदयाशी जोडलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्यशील व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाला संगीताच्या रूपात साजरं करणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. या गाण्यातून त्यांची वीरता, निष्ठा आणि संघर्ष रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मला खात्री आहे राज संभाजी गाणं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल, असं दिग्दर्शक तुषार शेलार म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.