आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग…; ‘धर्मवीर 2’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Dharmaveer 2 Trailer Launch By CM Eknath Shinde : धर्मवीर 2 सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी सिनेमातील सर्व कलाकार उपस्थित होते. राहुल नार्वेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग...; 'धर्मवीर 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
'धर्मवीर 2'चा धमाकेदार ट्रेलर रिलीजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 8:15 PM

बहुचर्चित ‘धर्मवीर 2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून ‘धर्मवीर 2’ सिनेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘धर्मवीर 2’ या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक याने दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलमधील डायलॉगने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या संघटनेचा माज आहे भगवा रंग… सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे, भगवा रंग. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता, हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग…, असा डायलॉग आनंद दिघे अर्थात प्रसाद ओक म्हणताना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

सिनेमा कधी रिलीज होणार?

येत्या 9 ऑगस्टला ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.’धर्मवीर 2’या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिलं आहे.

आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला,  चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी या पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आधी टीझर, मग गाणी आता ट्रेलर

काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता ‘धर्मवीर 2’ ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर 2’ चित्रपटातील गाणी पाहिल्यावर चित्रपटाचं कथानक, कलाकार यविषयाची लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.