Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Movie : ‘एका हाताचं अंतर’ लवकरच भेटीला येणार, नात्यांची गोष्ट सांगणारा नवीन चित्रपट प्लॅनेट मराठीवर पाहता येणार

एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर' हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.

Marathi Movie : 'एका हाताचं अंतर' लवकरच भेटीला येणार, नात्यांची गोष्ट सांगणारा नवीन चित्रपट प्लॅनेट मराठीवर पाहता येणार
'एका हाताचं अंतर' लवकरच भेटीला येणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 8:10 AM

मुंबई : एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ (Eka Hatach Antar Movie) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून मुहूर्त सोहळाही संपन्न झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गौरी नलावडे (Gauri Nalawade), अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar), नेहा जोशी (Neha Joshi), हेमंत ढोमे (Hemant Dhome), सिद्धार्थ चांदेकर (siddharth Chandekar), रेशम श्रीवर्धनकर (Resham Shrivardhan) हे कलाकार झळकणार आहेत. ‘एका हाताचं अंतर’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण निसर्गरम्य अशा पाँडीचेरीमध्ये होणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणतात, “प्लॅनेट मराठी सोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. तर काही कलाकारांसोबतही मी पहिल्यांदाच काम करत आहे. हे सगळेच कलाकार कमाल आहेत. या चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी असून कुटूंबासोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. नात्यातील विविध पैलू यात पाहायला मिळणार आहेत.’’

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रकाश कुंटे हे अतिशय उत्कृष्ट आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेसृष्टीला नेहमीच वेगवेगळे विषय दिले असून प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लवकरच एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. यापूर्वी आम्ही ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट केला होता ज्याचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात आले होते. आता ‘एका हाताचं अंतर’ या चित्रपटाचे चित्रीकरणही पाँडीचेरीमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आता एक नवीन चित्रीकरणस्थळ मिळाले आहे. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीही महाराष्ट्राबाहेर आपला ठसा उमटवू पाहात आहे.”

हाई आईक्यू एन्टरटेनमेंटचे राजीव रमेश अग्रवाल म्हणतात, ‘’प्लॅनेट मराठी ओटीटीच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आम्ही ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्या आयुष्याशी मिळतीजुळती असून मनोरंजनात्मक आहे. उत्कृष्ट कलाकार आणि पाँडीचेरीतील चित्रीकरण या चित्रपटातील जमेच्या बाजू आहेत.’’

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी व हाई आईक्यू एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा स्टेफानो मोर्कल्डो यांनी सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Photo Gallery | रणबीर सिंगची Austin Martin मधून सफर

Filmfare Awards 2022 : ऋतुराज वानखेडेला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जयंतीची ‘फिल्मफेअर’वर मोहोर

RRRची आsssरा रा राsss खतरनाक कमाई! 200 कोटींच्या क्लबमध्ये लवकर धडकणार

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....