Video : हरीश वांगीकर, अनुजा चौधरी यांचा ‘हळुवार पावले’ म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित, सप्तसूर म्युझिकची प्रस्तुती…

हळुवार पावले वेचित साजरी किनारी आली, रुणझुणता पैंजण नाद बासरीत गुंफून गेली अशा हळुवार ओळी असलेला नवाकोरा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे.

Video : हरीश वांगीकर, अनुजा चौधरी यांचा 'हळुवार पावले' म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित, सप्तसूर म्युझिकची प्रस्तुती...
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 8:20 AM

मुंबई : हळुवार पावले (haluvar paule song) वेचित साजरी किनारी आली, रुणझुणता पैंजण नाद बासरीत गुंफून गेली,  अशा हळुवार ओळी असलेला नवाकोरा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिक (saptsur music) या यूट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे. हरीश वांगीकरनं या म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीसह संगीत आणि गायनाची जबाबदारी निभावली आहे. नव्या दमाच्या कलावंतांना संधी देणाऱ्या सप्तसूर म्युझिकने हळुवार पावले हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. अनिकेत जंगम यांनी गीतलेखन केलं आहे, तर सचिन अंबट यांनी म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे.

हरीश वांगीकरनंच निर्मितीसह हळुवार पावले या गाण्याचं गायन आणि संगीताची जबाबदारी निभावली आहे. ऍडव्होकेट अनुजा चौधरीसह सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कार्यरत असलेला हरीश वांगीकर म्युझिक व्हिडिओमध्ये चमकला आहे. हरीशनं आतापर्यंत गायक, संगीतकार, अभिनेता म्हणून या पूर्वी काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत, तर अनुजानं असेही एकदा व्हावे हा चित्रपट, शौर्य, कुसुम अशा काही मालिका केल्या आहेत.

हळूवार पावले हे प्रेमगीत आहे. कोकणातल्या नितांत सुंदर परिसरात या म्युझिक व्हिडिओचं नेत्र सुखद चित्रीकरण करण्यात आलं आहे. तर हलक्याफुलक्या शब्दांना तितकंच श्रवणीय संगीत ही या म्युझिक व्हिडिओची खासियत आहे. अनुजा आणि हरीश या जोडीच्या म्युझिक व्हिडिओतील सफाईदार वावरानं या गाण्याला चार चाँद लावले आहेत. प्रेमाची हळुवार भावना या गाण्यातून अप्रतिम पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा म्युझिक व्हिडिओ आवडेल यात शंकाच नाही.

हरीश वांगीकरनं या म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीसह संगीत आणि गायनाची जबाबदारी निभावली आहे. नव्या दमाच्या कलावंतांना संधी देणाऱ्या सप्तसूर म्युझिकने हळुवार पावले हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. अनिकेत जंगम यांनी गीतलेखन केलं आहे, तर सचिन अंबट यांनी म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.