International Women’s Day 2021 | अभिनयच नाही तर, उद्योग विश्वातही मराठी मनोरंजन विश्वातल्या ‘या’ अभिनेत्रींचा दबदबा!
आपल्या लाडक्या अभिनेत्री केवळ अभिनयच नव्हे, तर चक्क उद्योग विश्वातही सक्रिय आहेत. उद्योग विश्वातही त्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे.
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात जसे नवनवीन प्रयोग होत राहतात, तसेच इथल्या कलाकारांनाही नवीन प्रयोग करून पाहण्याची आवड आहे. मराठी मनोरंजन जगतातल्या आपल्या आवडत्या आणि आघाडीच्या नायिका देखील यात मागे नाहीत. हो.. आपल्या लाडक्या अभिनेत्री केवळ अभिनयच नव्हे, तर चक्क उद्योग विश्वातही सक्रिय आहेत. उद्योग विश्वातही त्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे. ‘जागतिक महिला दिना’च्या खास निमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्या या नवनव्या उद्योगांबद्दल…(International Women’s Day 2021 Marathi Actress running successful business)
निवेदिता सराफ – ‘हंसगामिनी’
‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली ‘बबड्या’ची आई अर्थात अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ या एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत. त्यांचा स्वतः साड्यांचा ब्रँड असून, त्या स्वत: साड्या डिझाईन देखील करतात. ‘हंसगामिनी’ हा त्यांच्या साड्यांचा ब्रँड असून, त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मोठी मागणी आहे. ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिझायनर साड्या उपलब्ध करुन देणे हा ‘हंसगामिनी’चा उद्देश आहे. या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रिया मराठे – ‘द बॉम्बे फ्राईज’
अभिनेत्री प्रिया मराठे हिचा मुंबईत एक कॅफे आहे. लहानपणापासून प्रियाला खाद्यपदार्थांशी संबंधित एखादा व्यवसाय करायची इच्छा होती. म्हणून तिने मिरारोडला ‘द बॉम्बे फ्राईज’ नावाचा कॅफे सुरु केला आहे. शूटिंगमधून जसा वेळ मिळेल, तशी ती कॅफेमध्ये जात असते आणि सर्व सांभाळत असते (International Women’s Day 2021 Marathi Actress running successful business).
अपूर्वा नेमळेकर – ‘अपूर्वा कलेक्शन’
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड असून, ‘अपूर्वा कलेक्शन’ असे त्याचे नाव आहे. अपूर्वाला दागिने परिधान करण्याची आवड तर आहेच, परंतु तिला दागिने डिझाईन करायला देखील आवडतात.
तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे – ‘तेजाज्ञा’
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोघींचा कपड्यांचा ब्रँड आहे. ‘तेजाज्ञा’ हा व्यवसाय कोणतंही प्लॅनिंग वगैरे न करता सुरू झाला आहे. आपापलं शूटिंग आणि ‘तेजाज्ञा’ या दोन्ही गोष्टी एकत्र नीट सांभाळता याव्यात म्हणून आम्ही महिन्यातले दिवस ठरवून घेतले आहेत, असे तेजस्विनी आणि अभिज्ञा म्हणतात. या दोघींचा ‘तेजाज्ञा’ हा ब्रँड सगळ्यांमध्ये फारच चर्चेत आहे.
तितिक्षा तावडे आणि खुशबु तावडे – ‘साइडवॉक’
अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबु तावडे या दोन्ही सख्या बहिणींनी अभिनयाव्यतीरिक्त दोघीही उद्योग विश्वात सक्रिय झाल्या आहेत. खुशबू ही कॉफी प्रेमी असून, तिने अनेकदा कॉफी पिण्याच्या आवडीबद्दलही सांगितले आहे. या दोघींचा ‘साइडवॉक’ नावाचा कॅफे असून, या कॅफेसाठी दोघीही मेहनत घेताना दिसतात.
(International Women’s Day 2021 Marathi Actress running a successful business)
हेही वाचा :
Akash Thosar | आर्चीचा परश्या आता कुस्तीच्या आखाड्यात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
Zimma : ‘खास महिलांची खास धमाल’, महिला दिनानिमित्त ‘झिम्मा’चा टिझर रिलीज
बबड्या कायम एक नंबर, ‘अग्गंबाई सासूबाई’च्या चित्रिकरणाचा लास्ट डे, आशुतोष पत्कीला आठवणींचा उमाळा https://t.co/uvkiyNRRjq #Babdya | #AggabaiSasubai | #AggabaiSoonbai | #AshutoshPatki | #ZeeMarathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021