Locha Jhala Re On OTT : अंकुश, सिद्धार्थ आणि वैदेहीचा ‘लोच्या झाला रे’ सिनेमा ओटीटीवर येणार, ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार

Locha Jhala Re On OTT : धमाकेदार लोच्या करणाऱ्या 'लोच्या झाला रे या चित्रपटाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांनाही लोटपोट हसवले. चित्रपटगृहात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता जगभरातील प्रेक्षकांना हसवण्यासाठी 'लोच्या झाला रे' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Locha Jhala Re On OTT : अंकुश, सिद्धार्थ आणि वैदेहीचा 'लोच्या झाला रे' सिनेमा ओटीटीवर येणार, 'या' प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार
लोचा झाला रे-मराठी सिनेमाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:04 PM

मुंबई : धमाकेदार लोच्या करणाऱ्या ‘लोच्या झाला रे(Locha Jhala Re) या चित्रपटाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांनाही लोटपोट हसवले. चित्रपटगृहात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता जगभरातील प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘लोच्या झाला रे’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी ॲमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) ‘लोच्या झाला रे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पारितोष पेंटर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami), विजय पाटकर (Vijay Patkar), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), रेशम टिपणीस (Resham Tipanis) यांची धमाल पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, “महामारीमुळे आर्थिक चक्र विस्कटून गेले होते. मात्र आम्हाला हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करायचा होता आणि त्यासाठी आम्ही प्रतीक्षा केली. प्रेक्षकांकडून आलेला प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. प्रेक्षकांसाठी नववर्षाची ही खास भेट आम्ही देत आहोत.”

निर्माते नितीन केणी म्हणतात, ”ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षक पाहू शकतील, म्ह्णूनच आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात अनेक मराठी प्रेक्षक आहेत, ज्यांना मराठी चित्रपट पाहता येत नाहीत. त्यामुळेच आम्ही ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट परदेशातील सिनेमागृहातही प्रदर्शित केला होता. ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यासाठी आता आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत.”

लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रॉडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर व शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

हेलिकॉप्टरच्या पंख्याची फडफड आणि लाखो मुलींच्या हृदयाची धडधड एकाचवेळी… पाहा विजय देवरकोंडाचे एक्सक्लुझिव्ह फोटो

“डोकं घरी ठेवून आलात वाटतं”; भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडला जॉन

RRR Box Office Collection : ‘आरआरआर’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, 100 कोटींपासून केवळ काही पावलं दूर…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.