Marathi Movie : ‘तराफा’मध्ये अश्विनी कासार आणि पंकज खामकर यांची केमेस्ट्री, सिनेमा 6 मेला प्रेक्षकांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वीच पोस्टर लाँच झालेल्या 'तराफा' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अश्विनी कासार आणि पंकज खामकर ही जोडी दिसणार आहे. 6 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं या जोडीची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी रसिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Marathi Movie : 'तराफा'मध्ये अश्विनी कासार आणि पंकज खामकर यांची केमेस्ट्री, सिनेमा 6 मेला प्रेक्षकांच्या भेटीला
अश्विनी आणि पंकज- तराफाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:20 AM

मुंबई : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी कोरी जोडी एका आगामी चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोस्टर लाँच झालेल्या ‘तराफा’ (Tarafa) या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अश्विनी कासार (Ashwini Kasar) आणि पंकज खामकर (Pankaj Khamkar) ही जोडी दिसणार आहे. 6 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं या जोडीची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी रसिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. निर्माते अविनाश कुडचे यांनी भूमी प्रोडक्शन या बॅनरखाली ‘तराफा’ची निर्मिती केली असून, सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘तराफा’च्या पाहिल्या पोस्टरनं या चित्रपटाबाबतचं कुतूहल वाढवण्याचं काम केलं आहे. पोस्टरवर दिसलेले कलाकार नेमके कोण आहेत आणि यात नेमकी कोणत्या कलाकारांची जोडी असेल याबाबत बरेच कयास लावले गेले, बरीच चर्चा झाली, पण खरा अंदाज कोणीही बांधू शकले नाही. आता प्रोडक्शन हाऊसनंच या रहस्यावरून पडदा उठवत दोन्ही कलाकारांच्या नावांची घोषणा केली आहे.

अश्विनी कासार आणि पंकज खामकर हे दोन कलाकार ‘तराफा’च्या निमित्तानं प्रथमच एकत्र आले आहेत. यापूर्वी मालिकांमध्ये काम केलं असल्यानं दोघांनाही अभिनयाचा अनुभव आहे. चित्रपटातील काम मालिकांपेक्षा थोडं वेगळं असल्यानं ती कलाही आत्मसात करत दोघांनी आपापल्या व्यक्तिरेखा सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तराफा’च्या कथानकाला योग्य न्याय देण्यासाठी दोन नवीन चेहऱ्यांची गरज होती. याच कारणामुळं अश्विनी आणि पंकज यांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचं दिग्दर्शक सुबोध पवार यांचं म्हणणं आहे. पदार्पणातच दोघांनी अप्रतिम अभिनय केला असून, दोघांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव रसिकांना चित्रपट पाहिल्यावर नक्कीच होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

अश्विनी आणि पंकज या जोडीसोबत या चित्रपटात दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच सुबोध पवार यांनी ‘तराफा’ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन करत चतुरस्त्र कामगिरी बजावली आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून ‘तराफा’ची कहाणी पहायला मिळणार असून, संकलनाचं काम निलेश गावंड यांनी केलं आहे.

सुबोध आणि अमृता यांनी लिहिलेल्या गीतांना विजय गटलेवार, जयश्री करंबेळकर, विवेक नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे, तर प्रदीप कार्लेकर आणि शार्दुल कुंवर यांनी कोरिओग्राफी केली आहे. शाऊल गटलेवार यांनी वेशभूषा, तर संतोष भोसले यांनी रंगभूषा केली आहे. केशभूषा मनाली भोसले यांची असून, कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं आहे. सुधीर मेश्राम या चित्रपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असून, महेश जी. भारंबे कार्यकारी निर्माते आहेत.

संबंधित बातम्या

Sonam Kapoor-Ahuja : अभिनेत्री सोनम कपूरने बेबी बंपसह मोहक अंदाजातील फोटो केले शेअर

बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानचा खास अंदाज; पहा PHOTO

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.