Video : कामाला जायला उशीर झाल्यावर नशीब काय-काय करतं?, तुम्हालाही असा अनुभव आलाय का?, पाहा Kranti Redkarचा फनी व्हीडिओ…

क्रांती रेडकर एक हटके व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने मजेशीरपणे कामाला जायला उशीर झाल्यावर काय-काय घडतं हे सांगितलंय.

Video : कामाला जायला उशीर झाल्यावर नशीब काय-काय करतं?, तुम्हालाही असा अनुभव आलाय का?, पाहा Kranti Redkarचा फनी व्हीडिओ...
क्रांती रेडकर
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:26 PM

मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) तिच्या खुमासदार शैलीत इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हीडिओ शेअर करत असते. आताही तिने असाच एक हटके व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने मजेशीरपणे कामाला जायला उशीर झाल्यावर काय-काय घडतं याचं उत्तम उदाहरण देताना दिसतेय. कामाला जायला उशीर झाला की नशीब आणि नशीबाचा असिस्टंट कसा ठरवून डाव आखतात, हे तिनं सांगितलं आहे. नशीबाचा असिस्टंट म्हणतो “सर, आज ती परत उशीरा निघालीये.” तेव्हा नशीब म्हणतं, “अच्छा चल मग लिफ्ट बंद पाड…” पुढेही तिने अश्याच काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. तिचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय.

क्रांतीचा व्हीडिओ

क्रांती रेडकर एक हटके व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने मजेशीरपणे कामाला जायला उशीर झाल्यावर काय-काय घडतं हे सांगितलंय. कामाला जायला उशीर झाला की नशीबाचा असिस्टंट म्हणतो “सर, आज ती परत उशीरा निघालीये.” तेव्हा नशीब म्हणतं, “अच्छा चल मग लिफ्ट बंद पाड…” गाडी बंद पाडण्यासाठी कसा डाव आखला जातो. शिवाय ट्रॅफिक कसं वाढतं हेही तिने सांगितलं आहे. या व्हीडिओ “नशीबाचे खेळ उगाच म्हणत नाहीत, तुमच्यासोबत असं घडलंय का?”, असं कॅप्शन क्रांतीने दिलं आहे. तिचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय.

क्रांती रेडकरचा शॉपिंग किस्सा

क्रांती रेडकरने नुकतंच मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं जे पाहिलं त्यावर एक रील बनवलं. “मी एका मॉलमध्ये गेले होते, तिथे एक जोडपं चप्पल खरेदी करण्यासाठी आलं होतं. तो मुलगा बेबी तुला ही चप्पल चांगली दिसेल. हा कलर बघ तुला मस्त दिसेल, जरा चालून दाखव बघू… असं म्हणत होता. त्यांना पाहून मला असं वाटलं की कोण असतात ही माणसं?”, असं क्रांती या रीलमध्ये म्हटलं आहे. पुढे तिने तिचे पती समीर वानखेडे यांच्यासोबतचा शॉपिंगचा किस्सा सांगितला. “आम्ही एकत्र शॉपिंगला गेलो तर आम्हाला दोघांना लागणारी वस्तू जरी घ्यायची असेल तरी समीर खरेदीत फार रस घेत नाहीत ते नेहमी म्हणतात सगळं सेमचं तर आहे. कसला कलर? तुला जे हवं घे. असं समीर नेहमी म्हणतात”, असं क्रांती म्हणाली आहे. या रीलला तिने “मला खात्री आहे की मला टाइप वन वाला असा नवरा झेपला नसता” असं कॅप्शन दिलं आहे.

संबंधित बातम्या

Urfi javed : हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका, सगळी ‘हिरवाई’एकाच फोटोत

Esra Bilgic: ‘लाज वाटली पाहिजे तुला’ म्हणत पाकिस्तानी युजर्सनी अभिनेत्रीला ‘ब्रा’च्या जाहिरातीवरून केलं ट्रोल

‘अभिषेक, तूच माझा उत्तराधिकारी, बस कह दिया तो कह दिया’; ट्रोलर्सना Amitabh Bachchan यांचं सणसणीत उत्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.