सैराटमधली आर्ची ते फिट अभिनेत्री रिंकू राजगुरू…; कसं कमी केलं 12 किलो वजन?

Actress Rinku Rajguru Diet Plan For Weight Lose After Sairat Movie : अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या खूप फिट दिसते. मात्र सुरुवातीला चित्रपट सृष्टीत आली तेव्हा मात्र तिचं वजन जास्त होतं. तिने हे वजन कसं कमी केलं? तिचं डाएट कसं आहे? काही फिटनेस टिप्स, वाचा सविस्तर...

सैराटमधली आर्ची ते फिट अभिनेत्री रिंकू राजगुरू...; कसं कमी केलं 12 किलो वजन?
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 8:51 PM

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : रिंकू राजगुरु… पहिलाच हिट सिनेमा दिल्यानंतर रिंकू राजगुरु हिचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. सैराट हा सुपटहिट सिनेमा रिंकूने केला. त्यानंतर तिने आणखीही काही सिनेमे केले. मात्र सैराटमुळे मिळालेली ओळख रिंकूला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळं ठरवते. एका गावातील सामान्य मुलगी अन् तिच्या आयुष्यातील घडामोडी रिंकूने अचूक साकारल्या. सैराटमधील आर्ची या पात्राने रिंकूला महाराष्ट्रातील घराघरात ओळख दिली. हे पात्र साकारताना रिंकूचं वजन आता पेक्षा जास्त होतं. मात्र नंतर रिंकूमध्ये मोठं ट्रान्सफरमेशन पाहायला मिळालं. हे ट्रान्सफरमेशन नक्की कसं झालं? याविषयी रिंकू तिच्या मुलाखतींमध्ये व्यक्त होते.

अन् रिंकूने वजन कमी केलं…

सैराट सिनेमाच्या शुटिंगवेळी माझं वजन वाढलं. मी याच सिनेमाचं कन्नड व्हर्जनही केलं. त्यामुळे जवळपास 62 किलो वजन झालं होतं. पण त्या वजनात स्वत: ला पाहताना मलाच खूप ऑकवर्ड व्हायचं. टीममधले पण इतर लोक मला टोमणे मारायचे की, किती जाड झाली आहेस, असं… पण नंतर मी कुठेच गेले नाही. मग नंतर हळूहळू मी 12 किलो कमी केलं. मलाही वाटायचं की मी बारीक व्हावं अन् मी झाले, असं रिंकूने एका मुलाखतीदम्यान सांगितलं.

स्ट्रिक्ट डाएट

वजन कमी करण्यासाठी मी खूप स्ट्रिक्ट डाएट केलं. मी काहीच खायचे नाही. चपाती बंद केली होती. फक्त काकडी, ओट्स वगैरे खायचे. मी माझा माझाच टाएट प्लॅन केला होता. पण त्यामुळे माझ्या शरिरावर परिणाम झाला. चपाती-भाकरी याची माझ्या शरिराला सवय राहिली नाही. त्यामुळे ते पचायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच डाएट केलं पाहिजे, असं रिंकूने सांगितलं.

“प्रत्येक ठिकाणी वेगळी दिसते कारण…”

मी आईला सतत म्हणते की मी प्रत्येक ठिकाणी वेगळी का दिसते? त्यावर माझी आई म्हणते की, माझं वाढतं वय आहे. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी वेगळीच दिसणार आहे. आईचं मत आहे की, लोक तुला शरिरावर काम नाही देणार. तू चांगलं काम कर लोक तुला काम देतील, असं रिंकूने एका मुलाखतीत सांगितलं.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.