Gulhar Movie : शिवानी बावकरला ‘आली लहर!’, ‘गुल्हर’ सिनेमातील गाणं रिलीज

Gulhar Movie : ज्या गाण्याची झलक मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांच्या कानांना सुरेल संगीताची अनुभूती देत होतं ते आता प्रत्यक्ष भेटीला आलं आहे. 'गुल्हर'चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून सर्वत्र ज्या गाण्याची चर्चा होती, ते गाणं संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे.

Gulhar Movie :  शिवानी बावकरला 'आली लहर!', 'गुल्हर' सिनेमातील गाणं रिलीज
लहर आली गं- गाणं रिलीजImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:18 PM

मुंबई : ज्या गाण्याची झलक मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांच्या कानांना सुरेल संगीताची अनुभूती देत होतं ते आता प्रत्यक्ष भेटीला आलं आहे. ‘गुल्हर‘चं (Gulhar Movie) मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून सर्वत्र ज्या गाण्याची चर्चा होती, ते गाणं संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘गुल्हर’मधील ‘लहर आली, लहर आली गं (Lahar Aali G)‘ या गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. आता हे संपूर्ण गाणं व्हिडीओसह रिलीज करण्यात आलं आहे. ऑडीओप्रमाणेच या गाण्याचा व्हिडीओही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहे. सुमधूर संगीत आणि आवाजाच्या जोडीला ‘लहर’मधली शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि रमेश (Ramesh Chaudhari) ही नवी कोरी जोडीही प्रेक्षकांना भावत आहे. व्हिडीओ पॅलेसच्या माध्यमातून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी ‘गुल्हर’ची निर्मिती केली आहे. ‘गुल्हर’च्या दिग्दर्शनासोबतच रमेश चौधरी यांनी यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी बावकर या चित्रपटात रमेश चौधरींसोबत मुख्य भूमिकेत आहे. या दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं ‘लहर आली, लहर आली गं…’ हे गाणं ‘गुल्हर’मधील दोघांच्या प्रेमकथेत गुलाबी रंग भरण्याचं काम करणारं आहे. या निमित्तानं प्रेक्षकांना शिवानी आणि रमेश या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे.

या चित्रपटाची कथा जरी एका 11 वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आली असली तरी त्यात एका प्रेमी युगुलाच्या लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. हे गाणं वैभव कुलकर्णी आणि पद्मनाभ गायकवाड यांनी लिहिलं असून, पद्मनाभनंच अजय गोगावले आणि अपूर्वा निशादच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. रिलीज करण्यात आलेलं या गाण्याचं लक्षवेधी पोस्टर उत्सुकता वाढवणारं आहे. पावसात भिजणारी शिवानी-रमेश ही जोडी या पोस्टरवर आहे.

6 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या ‘गुल्हर’वर देश-विदेशातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या बऱ्याच पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपलं नाव कोरलं आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखनासोबतच तांत्रिक विभागातील कामाचंही कौतुक झालं आहे. मोहन पडवळ यांनी ‘गुल्हर’ची कथा लिहिली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे.

शिवानी-रमेश या जोडीसोबत या चित्रपटात रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांनी अभिनय केला आहे. उत्तम डिओपी आणि संकलक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुमार डोंगरे यांनी सिनेमॅटोग्राफीसोबतच संकलनही केलं आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत, विशाल पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन, तर निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. योगेश दीक्षित यांनी डिआयचं काम पाहिलं आहे. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत.

संबंधित बातम्या

Aliya Bhatta- Kapoor : खास पोस्ट लिहित आलियाने शेअर केले मेहंदीच्या सोहळ्याचे फोटो

Wedding : आलियाच्या लग्नानंतर भावूक झालेल्या महेश भट्ट यांनी जावई रणबीरला मारली मिठी, पाहा खास फोटो!

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता ‘थलपथी विजय’ यांच्याबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.